FD Rates | आजकाल अनेक लोक हे त्यांच्या भविष्यासाठी काही ना काही गुंतवणूक करत असतात. गुंतवणूक करण्याचे अनेक मार्ग पर्याय सध्या उपलब्ध आहेत. त्यामुळे वेगवेगळ्या गोष्टींमध्ये लोक गुंतवणूक करत असतात. आजकाल गुंतवणुकीचे महत्त्व देखील वाढलेले आहे. भविष्यात येणाऱ्या आर्थिक अडचणींचा सामना करण्यापासून लोक आत्तापासूनच त्यांच्या कमाईचा काही वाटा भविष्यासाठी गुंतवून ठेवतात. जेणेकरून नंतर त्यांना त्यांचा फायदा होईल. परंतु ही गुंतवणूक करताना तुम्हाला खूप काळजी घ्यावी लागते. पहिली गोष्ट म्हणजे तुमची केलेली बचत ही सुरक्षित आहे का? (FD Rates) आणि तुमच्या या गुंतवणुकीवर तुम्हाला किती परतावा मिळेल? अनेक लोक आजकाल FD मध्ये गुंतवणूक करतात. परंतु FD मध्ये गुंतवणूक केल्यावर कोणत्या बँकेत किती व्याजदर मिळतो? हे माहीत नसते. त्यामुळे ग्राहकांना FD वर मिळणारा व्याजदर आधीच माहित असणे खूप गरजेचे असते. जेणेकरून तुम्हाला कोणत्या बँकेत FD करावी हे समजेल. आज आपण देशातील प्रमुख बँकांमध्ये FD वर किती व्याजदर मिळते ते पाहूया.
HDFC बँक
HDFC बँक ही देशातील सर्वात मोठ्या बँकेपैकी एक आहे. या बँकांमध्ये अनेक लोक FD करतात. या बँकेतील 15 ते 29 दिवसाच्या FD साठी 3 टक्के व्याजदर मिळते. त्याचप्रमाणे ज्येष्ठ नागरिकांना 3.50% व्याज मिळते. 90 दिवस ते 6 महिन्याच्या FD वर 4.50% व्याज मिळते तर ज्येष्ठ नागरिकांना हे व्याजदर 5% एवढे मिळते. तुम्हाला जर एक वर्ष ते 15 वर्ष दरम्यान FD करायची असेल, तर त्यामध्ये सामान्य नागरिकांना 6.60% व्याज मिळते. तर ज्येष्ठ नागरिकांना 7.10% व्याज मिळते. तुम्हाला 21 महिने ते 2 वर्षापर्यंत FD करायची असेल, तर सामान्य नागरिकांना 7 टक्के आणि जेष्ठ नागरिकांना 7.50% एवढे व्याजदर मिळते. त्याचप्रमाणे 5 वर्षे ते 10 वर्षाच्या FD वर सामान्य नागरिकांना 60% व्याजदर मिळते तर जेष्ठ नागरिकांना 7.75 टक्के एवढे व्याजदर मिळते.
ICICI बँक | FD Rates
ICICI बँक ही देखील देशातील खूप मोठी बँक आहे. या बँकेत देखील अनेक लोक FD करतात. या बँकेमध्ये 15 ते 29 दिवसांच्या FD वर सामान्य नागरिकांना 3 टक्के तर जेष्ठ नागरिकांना 3.50% एवढे व्याजदर मिळते. 90 दिवस ते 120 दिवसांच्या 4.75 टक्के तसेच ज्येष्ठ नागरिकांना 5.25 टक्के एवढे व्याजदर मिळते. 1 वर्षासाठी FD वर सामान्य नागरिकांना 6.70% तर ज्येष्ठ नागरिकांना 7.20% एवढी व्याजदर मिळते. 3 वर्षे ते 5 वर्ष दरम्याने FD करायची असेल, तर सामान्य नागरिकांना 7 टक्के आणि ज्येष्ठ नागरिकांना 7.50% एवढे व्याजदर मिळते.
SBI बँक
स्टेट बँक ऑफ इंडिया ही देशातील सर्वात मोठी बँक आहे. या बँकेत देखील अनेक लोक FD करतात. या बँकेत 7 दिवस ते 45 दिवसाच्या FD वर 3 टक्के आणि जेष्ठ नागरिकांसाठी 3.50% एवढे व्याजदर मिळते. 180 ते 210 दिवसांचे FD वर 5.25 टक्के ते ज्येष्ठ नागरिकांना 5.75 टक्के एवढे व्याजदर मिळते. 1 वर्ष ते 2 वर्षाच्या FD वर सामान्य नागरिकांना 6.80% तर ज्येष्ठ नागरिकांना 7.3% एवढे व्याजदर मिळते. 2 वर्ष ते 3 वर्षाच्या FD वर सामान्य नागरिकांना सातत्याने ज्येष्ठ नागरिकांना 7.50% 5 वर्षे ते 10 वर्षे साठी सामान्य नागरिकांना 6.50% ते ज्येष्ठ नागरिकांना 7.50%