हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । FD Rates : सध्याच्या काळात फिक्स्ड डिपॉझिट्समध्ये गुंतवणुक करणे फायद्याचे ठरत आहे. जर आपणही FD करण्याचा विचार करत असाल तर ती लवकरात लव्क करा. कारण याद्वारे आता अवघ्या काही महिन्यांतच आपले पैसे दुप्पट होऊ शकतील. कारण सध्या सरकारी बँकांव्यतिरिक्त, अनेक स्मॉल फायनान्सिंग बँका देखील आपल्या एफडीवर मोठा रिटर्न देत आहेत.
रिझर्व्ह बँकेकडून रेपो दरात वाढ
हे जाणून घ्या कि, रिझर्व्ह बँकेकडून फेब्रुवारीच्या पहिल्याच आठवड्यामध्ये आपल्या द्वि-मासिक पतधोरण आढाव्यात रेपो दर वाढवण्याची घोषणा करण्यात आली. ज्यानंतर अनेक बँकांनी आपल्या एफडीवरील व्याज दरात वाढ केली आहे. अशा अनेक बँका आहेत ज्यामध्ये FD करून चांगला रिटर्न मिळवता येईल. चला तर मग कोणत्या बँका FD वर 9 टक्क्यांपेक्षा जास्त व्याज देत आहेत ते जाणून घेउयात… FD Rates
युनिटी स्मॉल फायनान्स बँक
इतर बँकांच्या तुलनेत या बँकेकडून ग्राहकांना एफडीवर सर्वाधिक व्याज दिला जातो आहे. ही बँक 101 दिवसांच्या FD वर सर्वसामान्य नागरिकांना 9% तर ज्येष्ठ नागरिकांना 9.50% पर्यंतचा व्याजदर देत आहे. FD Rates
उज्जीवन स्मॉल फायनान्स बँक
ही बँक देखील इतर बँकांच्या तुलनेत ग्राहकांना एफडीवर जास्त व्याज देत आहे. ही बँक 101 दिवसांच्या FD वर सर्वसामान्य नागरिकांना 8% तर ज्येष्ठ नागरिकांसाठी 8.75% व्याज दर देत आहे. FD Rates
उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक
ही बँक देखील इतर बँकांच्या तुलनेत ग्राहकांना एफडीवर जास्त व्याज देत आहे. या बँकेकडून 101 दिवसांच्या FD वर सर्वसामान्य नागरिकांना 8% तर ज्येष्ठ नागरिकांना 8.75% व्याजदर दिला जातो आहे.
नॉर्थ ईस्ट स्मॉल फायनान्स बँक
नॉर्थ ईस्ट स्मॉल फायनान्स बँकडूनही ग्राहकांना एफडीवर चांगला व्याजदर मिळतो आहे. या बँकेकडून 101 दिवसांच्या FD वर सर्वसामान्य नागरिकांना 8% तर ज्येष्ठ नागरिकांना 8.75% व्याज दिला जातो आहे. FD Rates
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://nesfb.com/Interest_Rates
हे पण वाचा :
BSNL च्या 87 रुपयांच्या प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉलिंगसोबत मिळवा डेली 1GB डेटा
Home Loan ची परतफेड लवकरात लवकर करण्याचा मार्ग जाणून घ्या
Torn Notes : फक्त ‘या’ बँकांमध्येच बदलता येतात फाटक्या नोटा, जाणून घ्या त्यासाठीचे नियम
Bank of Baroda कडून रिटेल टर्म डिपॉझिट्सवरील व्याजदरात 0.25 टक्क्यांची वाढ, पहा नवीन व्याजदर
अमेरिकेतील गोंधळामुळे बँकिंग क्षेत्रातील Mutual Funds मध्ये एका आठवड्यात सहा टक्क्यांनी घसरण