FD Rates : ‘या’ 2 बँकांमधील ज्येष्ठ नागरिकांसाठीची एफडी योजना 1 ऑक्टोबरपासून बंद होणार*

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । FD Rates : देशातील अनेक मोठ्या बँकांकडून कोविड-19 महामारीच्या काळात ज्येष्ठ नागरिकांसाठी स्पेशल एफडी योजना सुरू करण्यात आल्या होत्या. ज्या अंतर्गत, ज्येष्ठ नागरिकांना सध्याच्या व्याजदराच्या लाभाव्यतिरिक्त स्टॅण्डर्ड दरापेक्षा 50 बेसिस पॉइंट्सने जास्त व्याजदर दिले जाते. आयडीबीआय बँक, एसबीआय, एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक सारख्या बँकांनी स्पेशल एफडी योजना सुरू केल्या होत्या. मात्र, अलीकडेच एसबीआयकडून आपल्या वीकेयर सीनियर सिटीजन टर्म डिपॉझिट योजनेचा कालावधी 31 मार्च 2023 पर्यंत वाढवण्यात आल्याचे सांगण्यात आले. मात्र, 1 ऑक्टोबर 2022 पासून HDFC बँक आणि IDBI बँकेकडून ज्येष्ठ नागरिकांसाठीच्या स्पेशल FD योजना बंद केल्या जाणार आहेत. FD Rates

HDFC Bank extends special fixed deposit scheme for senior citizens | Mint

एचडीएफसी बँकेच्या स्पेशल एफडी विषयी जाणून घ्या

18 ऑगस्ट 2022 रोजी, HDFC बँकेकडून 2 कोटी रुपयांपेक्षा कमीच्या FD वरील व्याजदरांमध्ये सुधारण्या करण्यात आली होती. हे लक्षात घ्या कि, 18 मे 2020 रोजी, HDFC बँकेकडून सिनियर सिटीझन केअर एफडी लाँच करण्यात आली, जी 30 सप्टेंबर 2022 पर्यंत ऍक्टिव्ह असेल. या योजनेचा मॅच्युरिटीचा कालावधी 5 ते 10 वर्षांचा आहे, ज्यासाठी HDFC बँकेकडून 6.50% व्याज दर दिला जातो. हा दर 5.75% च्या स्टॅण्डर्ड दरापेक्षा 75 बेसिस पॉइंट्सने जास्त आहे. FD Rates

What is Fixed Deposit - FD Meaning and Features | IDFC FIRST Bank

एचडीएफसी बँकेच्या वेबसाइटवरील माहितीनुसार, “त्या ज्येष्ठ नागरिकांना 0.25% अतिरिक्त प्रीमियम (0.50% च्या सध्याच्या प्रीमियमपेक्षा) दिला जाईल, ज्यांना 5 कोटींपेक्षा कमी मुदतीची FD बुक करायची आहे आणि ज्याची मुदत 5 वर्षे ते 10 वर्षे आहे. हे लक्षात घ्या कि, ही योजना 18 मे 2020 ते 30 सप्टेंबर 2022 पर्यंत व्हॅलिड असेल. तसेच ही स्पेशल ऑफर वरील कालावधीत ज्येष्ठ नागरिकांनी बुक केलेल्या नवीन एफडीसाठी तसेच रिन्यूअलसाठी लागू होईल. मात्र ही योजना ARI ला लागू होणार नाही. FD Rates

IDBI Bank sale: 7 firms in race for transaction advisor | Mint

इंडियन बँकेच्या स्पेशल एफडी विषयी जाणून घ्या

खाजगी क्षेत्रातील IDBI बँकेने देखील 20 एप्रिल 2022 रोजी ज्येष्ठ नागरिकांसाठी “IDBI नमन सीनियर सिटीजन डिपॉझिट” स्पेशल FD लाँच केली. या योजनेचा मॅच्युरिटी कालावधी एक वर्षापेक्षा जास्त ते 10 वर्षांपर्यंत असतो. त्याची व्हॅलिडिटी 20 एप्रिल 2022 ते 30 सप्टेंबर 2022 पर्यंत असेल. तसेच यामध्ये ज्येष्ठ नागरिकांना सध्याच्या 0.50% च्या अतिरिक्त दरापेक्षा 0.25% अतिरिक्त व्याजदर मिळेल. म्हणजेच त्यांना एकूण 0.75% चा अतिरिक्त लाभ मिळेल. FD Rates

अधिक माहितीसाठी ‘या’ वेबसाईटला भेट द्या : https://www.hdfcbank.com/personal/resources/learning-centre/save/five-senior-citizen-tax-saving-schemes

हे पण वाचा :

T20 World Cup 2022 मधील टॉप 8 संघांच्या कर्णधारांच्या संपत्तीविषयी जाणून घ्या

Share Market मध्ये सलग दुसऱ्या दिवशी घसरण, FMCG-ऑटो सेक्टरमध्ये वाढ

‘या’ Multibagger Stock गेल्या 5 वर्षांत गुंतवणूकदारांवर पाडला पैशांचा पाऊस !!!

Rupee Co-operative Bank ला आजपासून ठोकले जाणार टाळे

Gold Price Today : सोन्या-चांदीच्या किंमतीत घसरण, आजचे नवीन दर तपासा