हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । FD Rates : RBI ने रेपो रेट आणि CRR (कॅश रिझर्व्ह रेशो) मध्ये वाढ केली आहे. ज्यानंतर आता सर्व सरकारी आणि खासगी बँकांचे कर्ज महागले आहेत. मात्र बँका दुसरीकडे FD वर जास्त व्याजही देत आहेत. ज्याचा FD मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना फायदा होत आहे. आता बँक ऑफ महाराष्ट्रनेही आपल्या FD वरील व्याजदरात वाढ करण्याची घोषणा केली आहे. बँकेने याआधीच कर्जाच्या व्याजदरात देखील वाढ केली होती.
बँकेने दिलेल्या माहितीनुसार, आता 7 दिवस ते 5 वर्षे मुदतीच्या FD वर 2.75 टक्के ते 4.9 टक्के व्याज दिले जात आहे. ही ऑफर 2 कोटी रुपयांपर्यंतच्या डिपॉझिट्ससाठी आहे. बँक ऑफ महाराष्ट्र आता देशांतर्गत FD वर 7 दिवसांपासून 45 दिवसांपर्यंत 2.75 टक्के व्याज देणार आहे तर 46 दिवस ते 90 दिवसांच्या FD वरील व्याजदर (FD Rates) 3.25 टक्के करण्यात आला आहे.
तसेच 91 दिवस ते 119 दिवस आणि 120 दिवस ते 180 दिवसांच्या FD वर बँक अनुक्रमे 3.5 टक्के आणि 3.75 टक्के व्याजदर देत आहे. त्याचबरोबर 181-270 दिवसांच्या FD वर 4 टक्के व्याज दिला जाईल. त्याचप्रमाणे, 271-364 दिवसांच्या आणि 1 वर्षापर्यंतच्या मुदतीच्या FD वर व्याजाचा दर (FD Rates) 4.25 टक्के आणि 5 टक्के आहे. बँक आता 1 वर्ष ते 5 वर्षांपर्यंतच्या FD वर 4.9 टक्के व्याज देईल.
ज्येष्ठ नागरिकांना बँक ऑफ महाराष्ट्र 91 दिवस आणि त्याहून अधिक कालावधीच्या 2 कोटी रुपयांपर्यंतच्या FD वर (FD Rates) 0.5 टक्के अतिरिक्त व्याज देत आहे. यापूर्वी बँकेने कर्जाच्या व्याजदरातही वाढ करण्याची घोषणा केली होती, जी 10 मे पासून लागू झाली आहे.
FD विषयीच्या अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://bankofmaharashtra.in/domestic_term_deposits
हे पण वाचा :
FD वर कोणती बँक देते जास्त व्याज?? पहा संपूर्ण लिस्ट
FD Interest Rates : PNB कडून FD च्या व्याजदरात बदल, नवीन दर तपासा
‘या’ बँकेने पुन्हा एकदा आपल्या FD वरील व्याजदरात केली वाढ, नवीन दर पहा