हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लोकांसाठी FD हा गुंतवणूकीचा नेहमीच एक लोकप्रिय पर्याय राहिला आहे. एफडी फक्त खात्रीशीर रिटर्नच देत नाहीत तर यामध्ये जोखीमही कमी असते. तसे पहिले तर फिक्स डिपॉझिट्स हे दोन प्रकारामध्ये विभागले जातात. यापैकी पहिली बँक एफडी आहे जी सर्वात लोकप्रिय आहे तर दुसरी कॉर्पोरेट एफडी आहे.
हे लक्षात घ्या कि, कॉर्पोरेट फिक्स डिपॉझिट्समध्ये व्याज जास्त मिळते. मात्र, बँकांच्या तुलनेत त्यामध्ये खूप जोखम आहे. अनेक लोकांकडे अजूनही FD शी संबंधित जोखमींबद्दलची माहिती . त्यामुळे यामधील जोखमींबद्दलची माहिती जाणून घेणे खूप महत्त्वाचे आहे. चला तर मग आज आपण फिक्स डिपॉझिटशी संबंधित जोखमींबद्दलची माहिती जाणून घेऊयात …
FD पूर्णपणे सुरक्षित नाहीत
लोकांना सामान्यतः बँकेमध्ये एफडी करणे हा सुरक्षित पर्याय वाटतो. मात्र इथे पैसे सुरक्षित जरी वाटत असले तरीही बँकेकडून काही चुक झाली तर आपलेचे फक्त 5 लाखांपर्यंतचे डिपॉझिट्सच सुरक्षित राहतात. सर्व फायनान्स कंपन्यांना देखील हाच नियम लागू होतो. हे लक्षात घ्या कि, डिपॉझिट इन्शुरन्स आणि क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन (DICGC) कडून फक्त 5 लाख रुपयांपर्यंतच्या बँक डिपॉझिट्सवर इन्सुरन्सची गॅरेंटी दिली जाते.
लिक्विडिटीची समस्या
बँकेच्या एफडीमध्ये लिक्विडिटीची समस्या असते, असे तज्ज्ञ मानतात. तसे पहिले तर जेव्हा गरज भासेल तेव्हा आपल्याला FD मधून मुदती आधीच पैसे काढता येतील, मात्र त्यावर काही दंड भरावा लागेल. इथे हे जाणून घ्या कि, एफडीवरील दंडाची रक्कम ही प्रत्येक बँकेनुसार बदलू शकते. जर तुम्ही टॅक्स सेव्हिंग एफडीमध्ये गुंतवणूक केली तर ती 5 वर्षापूर्वी काढता येईल. मात्र, त्यानंतर आपल्याला इन्कम टॅक्स सवलतीचा लाभ घेता येणार नाही.
महागाईच्या पटीत रिटर्न मिळत नाही
फिक्स्ड डिपॉझिट्स वर मिळणारा व्याजदर हा पूर्वनिर्धारित असतो. त्याच वेळी दुसरीकडे महागाईमध्ये सतत वाढ होऊ शकते. अशा परिस्थितीत वाढत्या महागाईच्या तुलनेत एफडीवर मिळणारा रिटर्न हा खूपच कमी असतो. सध्या हेच घडताना आपण पाहतोय. गेल्या महिन्यातील आकडेवारी पाहिली तर महागाईचा दर किंचित कमी होऊन 7.04 टक्क्यांवर आला आहे. त्या तुलनेत फिक्स्ड डिपॉझिट्सवरील व्याजदर कमी आहे. याचाच अर्थ असा कि आपल्याला नकारात्मक रिटर्न मिळत आहे.
टॅक्सचा भार
जर आपले वय हे 60 वर्षांपेक्षा जास्त नसेल तर फिक्स्ड डिपॉझिट्सवर मिळणाऱ्या व्याजाच्या उत्पन्नावर कर आकारला जाईल. तसे हे लक्ष घ्या कि, ज्येष्ठ नागरिकांना 50,000 रुपयांपर्यंतच्या व्याज उत्पन्नातून सूट देण्यात आली आहे. यामध्ये व्याज उत्पन्न आपल्या मिळकतीसह एकत्र केले जाते आणि तुमच्या स्लॅबनुसार टॅक्स आकारला जातो. यामुळेच जर आपण 30 टक्के टॅक्स स्लॅबमध्ये येत असू तर FD मधून मिळणारे हे 7 टक्के व्याज फक्त 4.9 टक्केच रिटर्न देऊ शकते.
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.bankbazaar.com/fixed-deposit-rate.html
हे पण वाचा :
PNB ने ग्राहकांना दिला धक्का, आता पेट्रोल-डिझेलच्या डिजिटल पेमेंटवर मिळणार नाही कोणतीही सूट !!!
Interest Rates : ‘या’ 5 खाजगी बँकाकडून बचत खात्यावर मिळत आहे सर्वाधिक व्याज !!!
Post Office मध्ये खातेदारांसाठी ‘हा’ नंबर आहे खूप महत्वाचा !!!
Gold Price Today : सोन्याच्या दरात घसरण तर चांदी किंचित वाढली, आजचे नवीन दर पहा