हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । FD : RBI कडून नुकतेच रेपो दरात 40 बेसिस पॉइंट्सने वाढ करण्यात आली आहे. ज्यानंतर अनेक बँकांच्या कर्जाच्या व्याजदरातही वाढ झाली आहे. अशातच आता बँका एफडी वरील व्याजदरही वाढवू लागल्या आहेत. याच भागात आता खासगी क्षेत्रातील कर्नाटक बँकेने आपल्या फिक्स्ड डिपॉझिट्स वरील व्याजदरात वाढ करण्याची घोषणा केली आहे.
कर्नाटक बँकेने देशांतर्गत तसेच अनिवासी विदेशी रुपयाच्या खात्यांमधील एफडी वरील व्याजदरात वार्षिक 0.15 टक्क्यांनी 5.25 टक्के वाढ केली आहे. नवीन दर 21 मे 2022 पासून लागू झाले आहेत.
शुक्रवारी एका निवेदन देताना कर्नाटक बँकेने म्हटले आहे की आपल्या देशांतर्गत आणि एनआरई (देशाबाहेर राहणारे नागरिक) साठीच्या फिक्स्ड डिपॉझिट्स(एक ते दोन वर्षांचा कार्यकाळ) वरील व्याजदरात 15 बेसिस पॉइंट्सनी वाढ केली आहे. म्हणजेच यामध्ये 5.25 टक्के वार्षिक वाढ झाली आहे. 10 कोटी रुपयांपर्यंतच्या डिपॉझिट्ससाठी ते वार्षिक 5.10 टक्के असेल.
एक्सिस बँकेनेही फिक्स्ड डिपॉझिट्सचे व्याजदर वाढवले
एक्सिस बँकेने आपले फिक्स्ड डिपॉझिट्सचे व्याजदर वाढवले आहेत. आता बँक 7 दिवस ते 10 वर्षांपर्यंतच्या एफडी वर 2.5 टक्के ते 5.75 टक्के व्याज देत आहे. तसेच 9 महिने ते 1 वर्ष आणि 1 वर्ष ते 15 महिने फिक्स्ड डिपॉझिट्सवरील व्याजदर अनुक्रमे 4.75 टक्के आणि 5.25 टक्के करण्यात आला आहे. बँकेकडून आता 15 महिन्यांपेक्षा जास्त मात्र 2 वर्षांपेक्षा कमी मुदतीच्या एफडी वर 5.3 टक्के व्याज दिले जात आहे. एक्सिस बँक 2 ते 5 वर्षांच्या एफडी वर 5.6 टक्के आणि 5 ते 10 वर्षांच्या फिक्स्ड डिपॉझिट्सवर 5.75 टक्के व्याज देत आहे. हे नवीन दर 12 मे 2022 पासून लागू करण्यात आलेले आहेत.
फेडरल बँकेने देखील फिक्स्ड डिपॉझिट्सचे व्याजदर वाढवले
फेडरल बँकेनेही आता आपल्या एफडी वरील व्याजदरात वाढ केली आहे. 16 मे 2022 पासून हे नवीन दर लागू करण्यात आलेले आहेत. बँकेकडून 2 कोटी रुपयांपर्यंतच्या एफडी चे व्याजदर वाढवण्याची घोषणा केली आहे. ही वाढ सर्व मुदतीच्या एफडी वर करण्यात आली आहे.
अधिक माहिती साठी या वेबसाईटला भेट द्या : https://karnatakabank.com/personal/term-deposits/interest-rates
हे पण वाचा :
Fixed Deposits : आता ‘या’ खाजगी बँकेने वाढवले FD वरील व्याजदर, नवीन दर तपासा
ICICI Bank कडून FD च्या व्याजदरात वाढ !!! नवीन दर पहा
Bank FD Rates : FD उघडाताय… जरा थांबा !!! कोण-कोणत्या बँका जास्त व्याज देत आहेत ते पहा
Bank FD : आता ‘या’ बँकांनी देखील आपल्या FD च्या व्याजदरात केली वाढ, नवीन दर तपासा