Tuesday, June 6, 2023

दिराच्या लग्नात वहिनींचा “लो चली मै अपने देवर की बारात लेके” गाण्यावर जबरदस्त डान्स

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – सगळीकडे सध्या लग्नाचा सिझन सुरू आहे. त्यामुळे लग्नाचे विविध व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. लग्नातल्या व्हीडिओमध्येही वरातीतील व्हीडिओ (Marrage Video) जास्त पसंत केले जातात. सध्या अशाच एका मिरवणुकीचा व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. यामध्ये वहिनींनी दिराच्या लग्नात लो चली मै अपने देवर की बारात लेके” या गाण्यावर जबरदस्त डान्स केला आहे. हा व्हीडिओ मिरवणुकीचा आहे. या व्हीडिओमध्ये वराच्या वहिनी आपल्या भाओजीच्या लग्नात जोरदार नाचताना दिसत आहेत.

हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर जोरदार धुमाकूळ घालत आहे. मिरवणुकीचा (Marrage Video) हा व्हीडिओ लोकांना खूप आवडला आहे. या व्हीडिओमध्ये नवरदेव घोड्यावर बसलेला दिसत आहे. यावेळी त्याच्या दोन वहिनी रस्त्यावर नाचताना दिसत आहेत. लो चली मै अपने देवर की बारात लेके! या गाण्यावर वराच्या वहिनी लेहेंग्यामध्ये डान्स करताना दिसत आहेत. आपल्या वहिनींना नाचताना पाहून घोड्यावर बसलेला नवरदेवही स्वतःला थांबवू शकत नाही. यानंतर तोही नाचू लागतो. वहिनींची ही बिन्धास्त स्टाईल अनेकांना आवडली आहे.

आणखी एक व्हीडिओ सध्या व्हायरल (Marrage Video) होत आहे. यात नवरी मुलगी डान्स कराताना दिसतेय तिच्यासोबत तिच्या सहा मैत्रिणीही पाहायला मिळत आहेत. हा व्हीडिओ सध्या चर्चेचा विषय बनला आहे. या व्हीडिओत वधू आणि तिच्या मैत्रिणींनी पलक तिवारीच्या ‘बिजली’ गाण्यावर डान्स करत आहेत. हासुद्धा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

हे पण वाचा :

आईच्या मृत्यूनंतर विरह सहन न झाल्याने 25 वर्षीय तरुणाची आत्महत्या

शरद पवार यांना धमकीचे ट्विट

KKR चा वेगवान गोलंदाज पॅट कमिन्स दुखापतीमुळे उर्वरित IPL मधून बाहेर

NIA ची मोठी कारवाई : डी गँगच्या दोघा जणांना अटक

एक दिवस औरंगजेबाच्या भक्तांना त्याच कबरीत जावे लागेल…, संजय राऊतांचा ओवेसींवर हल्लाबोल