Feeding Mango To Baby : लहान मुलांना ‘अशा’ प्रकारे आंबा खायला द्या, अजिबात बाधणार नाही; पहा काय सांगतात तज्ञ?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Feeding Mango To Baby) उन्हाळ्याच्या मौसमात सर्वाधिक खाल्लं जाणारं फळ म्हणजे आंबा. या दिवसात बाजारात आंबा मोठ्या प्रमाणावर येतो. ज्या त्या मौसमात येणारे फळ त्या त्या मौसमात खाणे आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते. आंबा हा स्वभावाने उष्ण असला तरीही उन्हाळ्यात काही निश्चित प्रमाणात आंब्याचे सेवन करणे फायदेशीर आहे. खास करून लहान मुलं जर पहिल्यांदाच आंबा खाणार असतील तर काही महत्वाची गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतात. मुलांच्या आरोग्यासाठी आंबा अधिक पोषणदायी ठरावा यासाठी नेमकं काय करता येईल? याविषयी तज्ञांनी काही महत्वाची माहिती दिली आहे. त्याविषयी आपण जाणून घेऊया.

अनेकदा लहान मुलांना पहिल्यांदा आंबा खायला दिल्यानंतर त्यांना तो पचत नाही किंवा उष्णता वाढल्याचे बाधतो. असे काहींचे अनुभव आहेत. शिवाय काही पालकांचे म्हणणे आहे की, मुलांना आंबा खायला दिल्याने त्यांना जुलाब होतात. (Feeding Mango To Baby) याविषयी बालरोगतज्ञ डॉ. पवन मांडविया यांनी त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर करत महत्वाची माहिती प्रदान केली आहे. या व्हिडिओत त्यांनी लहान मुलांना आंबा कसा खायला दिल्यास तो आरोग्यदायी ठरेल? याविषयी सविस्तर माहिती सांगितली आहे. चला तर पाहुयात हा व्हिडीओ.

डॉक्टर पवन यांचा व्हिडीओ

डॉक्टर पवन यांनी शेअर केलेल्या व्हिडिओत एक आई तिच्या मुलाला घेऊन त्यांच्याकडे उपचारासाठी आली आहे. यावेळी तिने आपल्या मुलाला आंबा खाल्ल्याने जुलाब झाल्याचे सांगितले आहे. (Feeding Mango To Baby) यावर डॉक्टरांनी तिला विचारले की, आंबा पाण्यात भिजवून मुलाला खायला दिला होता का?

यावर महिलेने, आंबा न भिजवता खाऊ घातल्याचे सांगितले. याबाबत सांगताना डॉक्टरांनी म्हटले की, आंब्यामध्ये फायटिक ऍसिड असते. ज्यामुळे आपल्या शरीरात उष्णता अचानक वाढते. परिणामी जुलाब होण्याचा धोका असतो. असेच काहीसे या प्रकरणात घडले आहे.

मुलांना आंबा कसा खायला द्यावा? (Feeding Mango To Baby)

डॉ. पवन यांनी मुलांना आंबा खायला देण्याच्या पद्धतीबाबत सांगितले की, मुलांना आंबा खायला देण्याआधी तो काही काळ पाण्यात भिजवून ठेवा. यामुळे आंब्यातील फायटिक ऍसिडचे प्रमाण बरेच कमी होईल. (Feeding Mango To Baby) ज्यामुळे मुलांच्या शरीरातील उष्णता अचानक वाढून त्यांना त्रास होणार नाही. याशिवाय तुम्ही आंबा पाण्यात भिजवून रेफ्रिजरेटरमध्येदेखील ठेवू शकता. यामुळेदेखील बाळाला जुलाब किंवा इतर कोणतीही गॅस्ट्रोइंटेस्टाइनल समस्या होण्याची शक्यता टाळता येईल.

पोषणदायी आंबा

आंबा हा फळांचा राजा म्हणून ओळखला जातो. आंब्यात भरपूर जीवनसत्त्वे, खनिजे आणि फायबर असतात. तसेच यात कॅलरीज कमी असतात. सर्वसाधारणपणे १ कप आंब्यात ९९ कॅलरी आणि २.६ ग्रॅम फायबर असते. शिवाय यामध्ये ६७% व्हिटॅमिन सी, २०% कॉपर, १०% व्हिटॅमिन ए आणि १०% व्हिटॅमिन ई सारख्या पोषक तत्त्वांचा समावेश असतो. (Feeding Mango To Baby) इतकेच काय तर आंब्यात फॉलिक ॲसिड, मॅग्नेशियम, पोटॅशियम, व्हिटॅमिन बी6 आणि व्हिटॅमिन के सारखे घटक देखील असतात. त्यामुळे सर्व बाजूने आंबा खाणे आरोग्याच्या दृष्टीने फायदेशीर ठरते.