….तेव्हा सुशांतने धोनीच्या निवृत्तीबाबत केलं होतं ‘हे’ भाष्य

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | सुशांतसिंग राजपूतने महेंद्रसिंग धोनीच्या बायोपिकमध्ये काम केले होते. हा चित्रपट सुपरहिट ठरला होता आणि सुशांतच्या अभिनयाचे सर्वांनीच कौतुक केले होते. सुशांत आणि धोनी एकत्र या चित्रपटाचे प्रमोशन करायचे. त्या काळात दोघांनीही एकमेकांशी बराच वेळ घालवला. एका मुलाखतीदरम्यान सुशांतने धोनीच्या निवृत्तीबद्दलही भाष्य केले होते.

सुशांत म्हणाला होता, धोनी योग्य वेळी निवृत्ती घेण्याचा निर्णय घेईल. जेव्हा आपण लीडरशिप क्वालिटी पुस्तक वाचतो तेव्हा ती सर्व गुणवत्ता धोनीमध्ये दिसते. तो बर्‍याच काळापासून भारताची सेवा करत आहे, म्हणून मला विश्वास आहे की निवृत्तीबाबत निर्णय घेण्याचा पूर्ण अधिकार फक्त त्यांनाच असावा. अखेर शनिवारी संध्याकाळी धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला निरोप दिला आहे.धोनीने एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये मुकेशने पार्श्वभूमीवर ‘मैं पल दो पल का शायर हु …’ हे गाणे गाताना दाखवले होते. या गाण्याने धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला निरोप घेतला आहे.

https://www.instagram.com/tv/CD6ZQn1lGBi/?utm_source=ig_web_copy_link

गेल्या वर्षी जुलैमध्ये धोनीने शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. 2019 च्या वर्ल्ड कपच्या उपांत्य फेरीत भारताला न्यूझीलंडविरुद्ध पराभवाला सामोरे जावे लागले होते आणि धोनीचा हा शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना ठरला.