औरंगाबाद – शहरातील अत्यंत वर्दळीच्या कॅनॉट परिसरातील एका हॉटेलमध्ये जेवणासाठी आलेल्या युवकांना दिलेल्या सलाड मध्ये कांद्याचा कोंब आलेला होता. त्यावरून वेटर सोबत झालेल्या बाचाबाचीचे रूपांतर राज्यामध्ये झाले हा प्रकार काल रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास घडला. यात हॉटेलमधील दोन जण जखमी झाले असून सिडको पोलिसांच्या सतर्कतेमुळे पुढील अनर्थ टळला. या प्रकरणी सिडको पोलिसांतर्फे तक्रार देत मध्यरात्रीनंतर गुन्हा नोंदवण्यात आला ची माहिती पोलिस निरीक्षक संभाजी पवार यांनी दिली आहे.
सिडको पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कॅनॉट परिसरातील हॉटेल व्हीआयपी मराठा मध्ये ब्रिजवाडी येथील दोन युवक जेवणासाठी आले होते. त्यांच्या जीवनातील सलाड मध्ये कांद्याला कोंब आलेला होता. त्यावरून त्यांनी वेटर सोबत बाचाबाची केली हा वाद सुरुवातीला मिटविण्यात आला. मात्र, जेवणानंतर त्या युवकांनी ब्रिजवाडीतील इतरांना बोलून घेतले त्यामुळे पुन्हा हॉटेल समोर राड्याला सुरुवात झाली. ब्रीजवाडीतील आलेल्या युवकांनी हॉटेलमधील दोन वेटरला मारहाण केल्याचे स्पष्ट झाले.
या राड यामुळे परिसरातील बघ्यांची गर्दी मोठ्या प्रमाणात जमा झाली होती. घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला. त्याच वेळी सिडको पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संभाजी पवार, सहाय्यक निरीक्षक श्रद्धा वायदंडे यांच्यासह पोलिसांचा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला. त्यामुळे राडा करणाऱ्या ब्रिज वाडीतील युवकांनी धूम ठोकली. यामध्ये जखमी झालेल्यांवर रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे. या राड्यामुळे कॅनॉट परिसरातील व्यावसायिकांमध्ये सध्या भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.