लखनऊ : वृत्तसंस्था – महिलेला अंबेचा अवतार म्हंटल जाते. साधी सरळ दिसणारी स्त्री जर आपल्या खऱ्या अवतारात आली तर काय काय करू शकते याचा प्रत्यय देणारा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. या व्हायरल व्हिडिओमध्ये एक तरुणी एका कॅफेबाहेर तरुणाची जबरदस्त धुलाई करताना (girl beating boy with kicks and pots) दिसत आहे. संतप्त तरुणीला तरुणाला बेदम मारहाण (girl beating boy with kicks and pots) केली. आधी तिने त्याला आपल्या हातानेच चोपून काढलं. त्यानंतर रागात तिने झाडाची कुंडीच त्याच्या डोक्यात फोडली. हि घटना उत्तर प्रदेशमधील लखनऊच्या एका कॅफेबाहेर शुक्रवारी रात्री घडली आहे.
कॅफेबाहेर तरुणीची तरुणाला बेदम मारहाण, कुंडीने तरुणाचे डोकेच फोडले pic.twitter.com/KotKnM6ZZS
— Ajay Rajaram Ubhe (@RajaramUbhe) July 23, 2022
त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या एका व्यक्तीने हि संपूर्ण घटना आपल्या कॅमेऱ्यात कैद केली आणि त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला. या व्हिडीओत पाहू शकता कॅफेबाहेर बरेच लोक जमलेले दिसत आहेत. तिथं दोन तरुणी रागात दिसत आहे. त्यांच्यासमोर एक तरुण उभा आहे. एक तरुणी दुसऱ्या तरुणीला त्या तरुणापासून दूर खेचत नेत असते. पण तरुणी काही ऐकायला तयार नाही. ती तरुणी पीडित तरुणाचे शर्ट खेचून त्याला आपल्या हातांनी मारते. तिथं जवळच झाडांच्या कुंड्या ठेवलेल्या आहेत. तिथल्या एकएक कुंड्या उचलून त्या तरुणावर (girl beating boy with kicks and pots) फोडते. पाठीत, पायावर आणि डोक्यावरही ती कुंडी फोडते.
या तरुणीसोबत असलेली दुसरी तरुणी तिला अडवण्याचा प्रयत्न करते. त्यानंतर सुरक्षारक्षकासह आणखी एक-दोन लोकही मध्यस्थी करायला येतात. कसंबसं करून ते त्या तरुणाची त्या तरुणीच्या तावडीतून सुटका (girl beating boy with kicks and pots) करतात. तरुणीला कॅफेच्या आत नेलं जातं आणि तरुणाला कॅफेच्या बाहेर काढले जाते. या दोघांमध्ये नेमका कोणत्या कारणावरून वाद (girl beating boy with kicks and pots) झाला हे मात्र अजून समजू शकलेले नाही.
हे पण वाचा :
“देवेंद्रजी मुख्यमंत्री होणार नाहीत, मला माहिती होतं”, अमृता फडणवीस यांचे मोठे विधान
आमदार शहाजी बापू पाटील यांनी कार्यकर्त्यांसोबत धरला ठेका, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल
खरे खंडणी बहाद्दर राष्ट्रवादीचे शशिकांत शिंदे : आ. महेश शिंदे
नांदेडमध्ये खंडणीप्रकरणी काँग्रेस नगरसेवकाच्या मुलाला अटक, तर शिवसेनेचा माजी नगरसेवक फरार