औरंगाबाद : घाटी रुग्णालयातील अपघात विभागात समोर उपचाराअभावी तडफडून मृत्यू झालेल्या प्रकरणात उपस्थित असलेले डॉक्टर वैद्यकीय अधिकारी कर्मचारी यांच्यावर गुन्हे दाखल करा, अशी तक्रार आरपीआयच्या वतीने बेगमपुरा पोलीस ठाण्यात देण्यात आली आहे.
16 मार्च रोजी घाटी रुग्णालयातील अपघात विभागात समोर एक अनोळखी व्यक्तीच्या पायाला जखम झाली होती तो रुग्ण सुमारे दोन तास अपघात विभागासमोर वेदनेने तडफडत होता, ही बाब काही नागरिकांनी उपस्थित वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या लक्षात आणून दिली. तरीदेखील घाटी रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर, कर्मचारी यांनी गांभीर्याने न घेता त्या रुग्णावर कुठलेही उपचार केले नाहीत.
काही तासानंतर त्या रुग्णाचा तेथेच तडफडून मृत्यू झाला होता. त्या रुग्णाला भरती करून त्यावर उपचार न करणाऱ्या डॉक्टर, वैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी तक्रार रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (आ) विद्यार्थी आघाडीचे मराठवाडा अध्यक्ष नागराज गायकवाड यांनी बेगमपुरा पोलीस ठाण्यात दिली आहे.
औरंगाबाद जिल्ह्यासह राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा
Click Here to Join Our WhatsApp Group