व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

इन्कम टॅक्सच्या कक्षेत नसला तरीही ITR भरा, याद्वारे कोणकोणते फायदे मिळतील जाणून घ्या

नवी दिल्ली । इन्कम टॅक्स रिटर्न भरणाऱ्यांपैकी बहुतांश लोकांचा असा समज असतो की, ज्यांचे उत्पन्न टॅक्सच्या कक्षेत येते तीच लोकं ITR फाइल करतात. मात्र ते तसे नाही. तुम्ही टॅक्सच्या जाळ्यात येत नसला तरीही तुम्ही टॅक्स रिटर्न भरला पाहिजे, कारण ITR भरण्याचे अनेक फायदे आहेत.

तुमचे इन्कम टॅक्स रिटर्नला पात्र नसला तरीही तुम्ही ते भरावे कारण तुम्हाला त्यातून अनेक फायदे मिळू शकतात. ITR दाखल करणाऱ्यांना लोन, टॅक्स रिफंड सहज मिळू शकतो. उत्पन्नाचा दाखला बनवताना फायदा होतो. अशाप्रकारे, अशा अनेक गोष्टी आहेत, ज्यांचा फायदा टॅक्स रिटर्न भरणाऱ्यांना होतो.

ITR व्हॅलिड उत्पन्नाचा पुरावा म्हणून देखील काम करते. यासह, ते व्हॅलिड रहिवासी पुरावा म्हणून देखील काम करते. एखादा व्यवसाय सुरू करण्यासाठीही ITR भरणे खूप महत्त्वाचे आहे. तुम्हाला कोणत्याही विभागाकडून कंत्राट घ्यायचे असेल तर ITR कामी येईल. कोणत्याही सरकारी विभागात कंत्राट घेण्यासाठी गेल्या 5 वर्षांचा ITR आवश्यक आहे.

सहजपणे लोन मिळवा
जर तुम्ही इन्कम टॅक्स रिटर्न भरला तर तुम्हाला सहजपणे लोन मिळू शकते. कारण कोणतेही लोन देण्यापूर्वी बँक किंवा फायनान्स कंपनी तुमच्या उत्पन्नाचा तपशील पाहते आणि ITR मध्ये उत्पन्नाचा तपशील असतो. तुमच्या ITR वरूनच तुम्हाला किती लोन द्यायचे हे बँक ठरवते. त्यामुळे वेळेवर ITR भरल्यास लोन मिळणे सोपे होते. त्यामुळे तुम्हाला होम लोन, कार लोन किंवा पर्सनल लोन घ्यायचे असेल तर तुम्हाला ITR फाइल करणे आवश्यक आहे.

टॅक्स रिटर्न
इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे तुम्हाला वेगवेगळ्या बचत योजनांमधून मिळणाऱ्या व्याजावर टॅक्स सूट मिळते. तुमचे उत्पन्न यापैकी एकापेक्षा जास्त स्त्रोतांकडून असल्यास, जर ते रु. 2.5 लाखांपेक्षा जास्त असेल तर तुम्ही कपात केलेल्या TDS वर पुन्हा क्लेम करू शकता.

इन्शुरन्स साठी देखील आवश्यक आहे
इन्शुरन्स कंपन्या जास्त इन्शुरन्स कव्हर असण्याच्या अटीवर किंवा 1 कोटी रुपयांपर्यंतच्या टर्म प्लॅनवर ITR पाहतात. उत्पन्नाचा स्रोत आणि परतफेडीची स्थिती तपासण्यासाठी कंपन्या ITR मागतात.

शेअर्स किंवा म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठीही ITR हा एक चांगला स्रोत आहे. नुकसान झाल्यास, तोटा पुढील वर्षासाठी पुढे नेण्यासाठी विहित मुदतीत ITR भरणे आवश्यक आहे. पुढील वर्षात भांडवली नफा झाल्यास, तोटा नफ्याच्या तुलनेत एडजस्ट केला जाईल आणि तुम्हाला टॅक्स सूटमध्ये लाभ मिळेल.

व्हिसा मिळणे सोपे
ITR च्या आधारे व्हिसा मिळणे सोपे आहे. अनेक देश व्हिसासाठी ITR ची मागणी करतात. ज्याद्वारे व्हिसा प्रक्रिया अधिकाऱ्यांना व्यक्तीची सध्याची आर्थिक परिस्थिती आणि उत्पन्नाची माहिती मिळते.