वांग नदीवरील पुलाचे बांधकाम करणाऱ्या ठेकेदारावर गुन्हा दाखल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी

कराड तालुक्यातील अंबवडे येथील वांग नदी जुना बंधारा पुलावरून दुचाकी नदीत घसरून दोघांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी वांग नदीवरील जुना बंधारा पुलाचे काम करणार्‍या ठेकेदारावर कराड तालुका पोलिसात गुन्हा नोंद कण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, येरवळे येथील शरद यादव हे त्यांची आई मालन, मुलगी तनुजा, मुलगा पियुष हे शनिवारी रात्री 7 वाजण्याच्या सुमारास वांग नदी जुना बंधारा पुलावरून येत असताना ठेकेदार याने नुतनीकरणाकरीता आणलेले साहित्य खडी, ग्रीड, कच ही पुलावर ठिकठिकाणी तशीच मोकळी स्थितीत ठेवून नूतनीकरण चालू असल्याबाबत पुलाच्या दोन्ही बाजूस तसे नुतनीकरणाचे सूचना फलक, दिशादर्शक फलक व रिफलेक्टर, स्पीडब्रेकर, पक्के बॅरिकेटींग वेळोवेळी न करता ठेकेदाराच्या हलगर्जी व निष्काळजीपणामुळे सदर शरद यादव यांची दुचाकी ही खडी, वाळू, ग्रीड वरून घसरून वांग नदी पात्रातील पाण्यात पडून मालन यादव व पियुष यादव यांचे मरणास कारणीभूत ठरल्याप्रकरणी ठेकेदारावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस करीत आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘hello news’

Leave a Comment