हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ज्या करदात्यांनी 31 जुलै 2022 पर्यंत काही कारणास्तव आयटीआर ITR दाखल केलेला नाही, त्यांना आता सरकारकडून आणखी एक संधी मिळाली आहे. अशा करदात्यांनी 31 डिसेंबर 2022 पर्यंत आयटीआर भरता येईल. मात्र, यासाठी त्यांना 5000 रुपये लेट फी भरावी लागणार आहे. मात्र जर करदात्यांनी यावेळीही आयटीआर भरला नाही तर पुढील वर्षी त्यांना 10,000 रुपये भरावे लागतील. मात्र इथे हे लक्षात ठेवा की, यामध्ये त्या लोकांचा समावेश नाही ज्यांच्या ITR चे ऑडिट आवश्यक आहे. त्याप्रमाणे ज्यांचे एकूण उत्पन्न 5 लाख रुपयांपेक्षा जास्त नाही अशा लोकांनाही यामध्ये थोडा दिलासा देण्यात आला आहे.
आरएसएम इंडियाचे संस्थापक असलेले डॉ. सुरेश सुराणा म्हणतात की,” ज्यांचे एकूण उत्पन्न 5 लाख रुपयांपेक्षा जास्त नाही, त्यांना लेट फी म्हणून फक्त 1000 रुपयेच भरावे लागतील. ITR उशीरा भरल्यास फक्त लेट फीच नाही तर या टॅक्सवर व्याजही भरावे लागते. मात्र हे व्याज मासिक आधारावर आकारले जाईल. आयटी कायद्यानुसार, करदात्यांकडून टॅक्सच्या रकमेवर 1% पर्यंत व्याज आकारले जाऊ शकेल.
ITR दाखल न केल्यास काय होईल???
सुरेश सुराणा यांनी स्पष्ट केले की,” जर करदात्याने वेळेत ITR दाखल केला नाही तर, इन्कम टॅक्स डिपार्टमेंटला करदात्याकडून नोंद न केलेल्या उत्पन्नाच्या 50% इतका दंड आकारण्याचा अधिकार आहे. जर डिपार्टमेंटला वाटत असेल की, हा आयटीआर हेतुपुरस्सर दाखल केला गेला नाही तर डिफॉल्टरला 6 महिने ते 7 वर्षांपर्यंत तुरुंगवास देखील होऊ शकेल. हे जाणून घ्या कि, करचुकवेगिरीची रक्कम 25 लाख रुपयांपेक्षा कमी असेल तर 3 महिने ते 2 वर्षांच्या तुरुंगवासाच्या शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे.
पॅन-आधार लिंक करावे लागेल
आयटीआर भरण्यासाठी करदात्याने आपले पॅन आणि आधार कार्ड लिंक करणे आवश्यक आहे. जर हे केले नसेल तर ITR दाखल करता येणार नाही. तसेच आता आधारशी पॅन लिंक करण्याची शेवटची तारीखही निघून गेली आहे, त्यामुळे यासाठी आता 1000 रुपये दंडही भरावा लागेल. याबरोबरच इन्कम टॅक्सच्या वेबसाइटवर आयटीआर भरण्यासोबतच पॅनला आधारशी लिंक करण्याचे कामही करता येईल.
अधिक माहितीसाठी ‘या’ वेबसाईटला भेट द्या : https://www.incometax.gov.in/iec/foportal/
हे पण वाचा :
Train Cancelled : रेल्वेकडून आज 323 गाड्या रद्द !!! अशा प्रकारे तपासा रद्द झालेल्या गाड्यांची लिस्ट
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या किंमतीत किंचित घसरण, आजचे दर तपासा
Aadhar Card 10 वर्षांपेक्षा जुने झाले आहे ??? अशा प्रकारे करा अपडेट
Bank Loan : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, आता फक्त मिस कॉल अन् मेसेज द्वारे अशा प्रकारे मिळेल कृषी लोन
‘या’ Multibagger Stock ने गेल्या 20 वर्षांत दिला 1920% रिटर्न