दिल्ली प्रतिनिधी। हैद्राबाद मध्ये काही दिवसांपूर्वी झालेल्या सामूहिक बलात्काराच्या घटनेनंतर संपूर्ण देशभरात संतापाची लाट उसळली आहे. हे अमानवी कृत्य समोर आल्यानंतर देशभरातील नागरिक, सेलिब्रिटी, मान्यवर यांनी गुन्हेगारांना कठोर शिक्षा करण्याची मागणी केली आहे. तसेच सोशल मीडियावर देखील या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला जात आहे.
मात्र आता दाक्षिणात्य चित्रपट निर्माता डेनियल श्रवण यांच्या एका सोशल मीडिया वरील पोस्ट मुळे नवीन वाद निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ‘महिलेची हत्या न करता गुन्हेगारांनी बलात्कार करून थांबावे यासाठी सरकारने कायदेशीर तरतुदी करून प्रोत्साहन द्यावे’ अशी विचित्र मागणी श्रवणने यांनी सोशल मीडिया पोस्टमध्ये केली आहे. तसेच १८ वर्षांवरील मुलींनाही याबाबत प्रशिक्षित करण्यात यावे असे सांगताना श्रवणने चक्क मुलींनी पुरूषांच्या कामवासनेस प्रतिकार करू नये असा सल्ला दिला आहे. हे केले तरच अशाप्रकारच्या हत्या थांबतील असे तर्कही त्याने मांडले आहेत.
दरम्यान त्यांच्या या संतापजनक मागणीमुळे सर्व स्तरातून त्यांच्यावर टीका केली जात आहे. तसेच ही पोस्ट देखील चांगलीच व्हायरल झाली आहे. त्यांच्यावर सर्व स्तरातून टीका झाल्यानंतर काही वेळातच श्रवणने त्याची ही पोस्ट डिलीट केली आहे.
ReplyForward
|