आजपासून 12 वीच्या परीक्षेला प्रारंभ; कॉपीमुक्त परीक्षा अभियानासाठी बोर्ड सज्ज

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात आजपासून बारावीच्या बोर्ड परीक्षेला सुरुवात होत आहे. त्याची संपूर्ण तयारी पूर्ण झाली असून बोर्डसह इतर यंत्रणा सज्ज झाल्या आहेत. राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून ही परीक्षा आयोजित केली जाते. यंदाच्या वर्षी 14 लाख 57 हजार 293 विद्यार्थी परीक्षेला पात्र आहे. त्यासाठी 3 हजार 195 केंद्रांची नियुक्ती करण्यात आली आहे.

शिक्षण मंडळाकडून कॉपीमुक्त अभियान राबविण्यासाठी यंदाच्या वर्षी तब्बल 271 भरारी पथक असणार आहे. तर ही संपूर्ण परीक्षा प्रक्रिया राबविण्यासाठी 21 हजार 396 शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहे. बोर्ड परीक्षेचे नियोजन करत असतांना दोन सत्रात या परीक्षा होणार आहे. त्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्याने कमीतकमी अर्धा तास अगोदर परीक्षा केंद्रावर उपस्थित असणे अनिर्वाय केले आहे. परीक्षेपूर्वी आसन क्रमांक आणि वर्ग शोधण्यासाठी तीस मिनिटे अगोदर बोलावण्यात आले आहे.

पहिल्या सत्रातील परीक्षा ही सकाळी अकरा वाजता सुरू होणार आहे. मात्र, विद्यार्थ्यांनी त्यासाठी साडेदहा वाजताच परीक्षा केंद्रावर हजर व्हायचे आहे. तर दुसऱ्या सत्रात होणारी परीक्षा ही तीन वाजता असणार आहे. त्यासाठी अर्धा तास अगोदर म्हणजेच अडीच वाजता परीक्षा केंद्रावर हजर राहायचे आहे.

विशेष पथकांची नियुक्ती

बारावी परीक्षेत कॉपीचा प्रकार घडू नये यासाठी बोर्डकडून विशेष पथके तयार करण्यात आली आहे. त्यासाठी संपूर्ण राज्यात 271 पथके विविध परीक्षा केंद्रांवर धडक देणार आहे. कॉपी करतांना कुठलाही विद्यार्थी आढळून आल्यास त्याच्यावर कारवाई केली जाणार आहे. कॉपीमुक्त परीक्षा केंद्र करण्यासाठी विशेष भर देण्यात आला आहे. याशिवाय निर्धारित वेळेपेक्षा दहा मिनिटे वेळ वाढवून देण्यात आली आहे.

कंट्रोल रूमच्या माध्यमातून राहणार नजर

संपूर्ण परीक्षेच्या काळात जीपीएस वाहनांचा वापर केला जाणार आहे. कंट्रोल रूमच्या माध्यमातून त्यावर नजर ठेवली जाणार आहे. प्रत्येक परीक्षा केंद्रावर वाहन कोणत्या मार्गाने जात आहे.