सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके
अफझलखान कबर परिसरात 1 एकर जागेत अतिक्रमण करण्यात आले होते, ते संपूर्ण अतिक्रमण जिल्हा प्रशासनाने पोलीस संरक्षणात पाडले आहे. यामध्ये 19 खोल्या 2 विश्रांतीगृहाचा समावेश होता. अफजलखान कबर परिसरात केलेलं अतिक्रमण पूर्णपणे काढण्यात प्रशासनाला यश आल्याची माहिती जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी दिली आहे.
सदरची अतिक्रमण पाडण्याची कारवाई थांबवावी अशी याचिका ऍड. निजाम पाशा यांनी सुप्रीम कोर्टात काल दाखल केली होती. यावर आज सुनावणी होणार आहे, तत्पूर्वी हे संपूर्ण अतिक्रमण पाडण्यात आले आहे. 1980 ते 85 साली या ठिकाणी अतिक्रमण व्हायला सुरुवात झाली होती. ही बाब हिंदुत्ववादी संघटनांनी निदर्शनात आणून देत 2006 साली या विरोधात मोठं आंदोलन उभारल गेलं होत.
कबर परिसरात तब्बल 26 वर्ष त्या ठिकाणी कलम 144 लागू करण्यात आले होते. अखेर काल रात्री पोलीस बंदोबस्तात हे संपूर्ण अतिक्रमण जमीनदोस्त करण्यात आले असून या ठिकाणी फक्त अफजलखान कबर आणि सय्यद बंडा कबर शिल्लक आहे.