हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सध्या कार बाजारात टाटा मोटर्सच्या वाहनांची मागणी जास्त वाढताना दिसत आहे. या मागणीला विचारात घेऊनच टाटा मोटर्स कंपनीने आज त्यांची Tata Nexon Facelift लॉन्च केली आहे. कंपनीने नेक्सॉन फेसलिफ्ट 11 प्रकार आणि सहा रंगांमध्ये लॉन्च केली आहे. ज्यामध्ये 1.2लिटर टर्बो-पेट्रोल आणि 1.5-लिटर डिझेल इंजिन उपलब्ध आहे. कंपनीकडून लॉन्च करण्यात आलेल्या फेसलिफ्टेड Nexon ची किंमत 8.09 लाख रुपये इतकी आहे. या कारमध्ये अनेक अपडेटेड फीचर्स देण्यात आले आहेत.
कंपनीकडून लॉन्च करण्यात आलेल्या टाटा नेक्सॉनच्या बाह्य डिझाइनमध्ये अनेक खास बदल करण्यात आले आहेत. या नवीन मॉडेलमध्ये लोखंडी जाळी, बंपर, एल आकाराचे एलईडी डीआरएल, स्प्लिट हेडलॅम्प सेटअप आणि एअर डॅम आहे. तसेच दोन्ही बाजूंनी, रेल, ब्लॅक-आउट, बी-पिलर टाकण्यात आले आहेत. त्यासोबत, मागील प्रोफाइलमध्ये नवीन बंपर, Y-आकाराचे LED टेललाइट्स, LED लाइट बार आणि रिव्हर्स लाइट्स देण्यात आली आहेत.
Tata Nexon Features
नवीन नेक्सॉन फेसलिफ्टचा आतील भाग पूर्णपणे अपडेट करण्यात आला आहे. ज्यात संपूर्ण डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर करण्यात आले आहे. तसेच, 10.25-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, ऍपल कारप्ले आणि अँड्रॉइड ऑटो कनेक्टिव्हिटी देण्यात आली आहे. इतकेच नव्हे तर, इलेक्ट्रिक सनरूफ, नवीन AC पॅनेल आणि टू-स्पोक स्टीयरिंग व्हील यांचा देखील समावेश करण्यात आला आहे. सोबतच, नवीन गियर लीव्हर, ड्राइव्ह मोडसाठी रोटरी डायल, पर्पल अपहोल्स्ट्री आणि ऑटो-डिमिंग IRVM ही खास वैशिष्ट्य नेक्सॉनमध्ये देण्यात आली आहेत.
Tata Nexon Price
खास म्हणजे, नेक्सॉन फेसलिफ्टमध्ये सात-स्पीड DCT युनिटसह जोडलेले आहे. तसेच, कारमध्ये 1.5-लिटर डिझेल इंजिन देण्यात आले आहे. जे 113bhp आणि 260Nm टॉर्क जनरेट करते. तसेच ते सहा-स्पीड मॅन्युअल युनिट किंवा AMT युनिटशी संबंधित आहेत. आता आपण यांच्या किमती विषयी बोलायला गेलो तर, नवीन नेक्सॉनची शोरूम किंमत 8.09 लाख रुपये इतकी आहे. नेक्सॉन फेसलिफ्ट स्मार्ट+ पेट्रोल एमटीची किंमत 9.10 लाख रुपये आहे. नेक्सॉन फेसलिफ्ट फिअरलेस पेट्रोल MT किंमत 12.50 लाख रुपये आहे. प्रत्येक मॉडेल नुसार त्याच्या किमती ठरवण्यात आल्या आहेत.
Tata Nexon competitor
Tata Nexon ही कार बाजारातील Hyundai Venue, Kia Sonet, Mahindra XUV300, Nissan Magnite, Renault Kiger आणि Mahindra Bolero Neo यांच्याशी प्रतिस्पर्धा करेल.