हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Financial Changes : आता लवकरच नवीन वर्ष येणार आहे. मात्र या नवीन वर्षात असे अनेक मोठे बदल होणार आहेत, ज्याचा थेट परिणाम सर्वसामान्यांवर होणार आहे. चला तर पुढील महिन्यापासून कोणते नियम लागू होतील ते पाहूयात…
हे जाणून घ्या कि, पहिल्या तारखेपासून जे 5 मोठे बदल होणार (Financial Changes) आहेत. यातील पहिला म्हणजे वाहनांच्या किंमतील वाढ. आता 1 जानेवारी 2023 पासून मारुती सुझुकी, ह्युंदाई मोटर, टाटा मोटर्स, मर्सिडीज-बेंझ, ऑडी, रेनॉल्ट, किया इंडिया आणि एमजी मोटर कडून आपल्या वाहनांच्या किंमतीत वाढ केली जाणार आहे.
1 जानेवारीपासून जीएसटीचे नियमही बदलणार (Financial Changes) आहेत. 5 कोटींहून जास्त वार्षिक उलाढाल असलेल्या व्यावसायिकांसाठी आता ई-इनव्हॉइस तयार करणे बंधनकारक असेल.
याशिवाय काही बँकांच्या क्रेडिट कार्डशी संबंधित नियमातही बदल (Financial Changes) केले जाणार आहेत. जसे कि, HDFC बँक क्रेडिट कार्डचे रिवॉर्ड पॉईंट्स आणि फी स्ट्रक्चरमध्ये बदल करणार आहेत. यासोबतच SBI देखील आपल्या SimplyCLICK कार्डधारकांसाठीच्या काही नियमांत बदल करणार आहे.
या नवीन वर्षांत फोनशी संबंधित नियम देखील बदलणार आहेत. आता 1 तारखेपासून, प्रत्येक फोन उत्पादकाला आणि त्याच्या आयात आणि निर्यात कंपनीसाठी प्रत्येक फोनच्या IMEI नंबरचे रजिस्ट्रेशन करणे बंधनकारक असेल.
याशिवाय बँकेच्या लॉकरशी संबंधित निमय देखील बदलणार (Financial Changes) आहेत. आता ग्राहकांना 1 तारखेपासून बँकेचे लॉकर वापरण्यासाठी नवीन लॉकर करारावर स्वाक्षरी केली आहे की नाही याची खात्री करावी लागेल.
अधिक माहितीसाठी ‘या’ वेबसाईटला भेट द्या : https://www.rbi.org.in/commonperson/English/Scripts/Notification.aspx?Id=1341
हे पण वाचा :
Gold Price : सोने-चांदी महागले, जाणून घ्या सराफा बाजाराची आठवडाभराची स्थिती
अगदी कमी किंमतींत घरी आणा ‘ही’ Portable Washing Machine, किंमत तपासा
BSNL च्या प्लॅनमध्ये 365 दिवसांच्या व्हॅलिडिटीसोबत मिळेल डेली 2GB
Jandhan Account : जनधन खातेधारकांना झिरो बॅलन्सवरही मिळेल 10,000 रुपयांचा लाभ, कसे ते जाणून घ्या
FD Rates : ‘या’ NBFC ने FD वरील व्याजदरात केली वाढ, नवीन दर तपासा