राष्ट्रवादीत अजित पवारांची घुसमट, आमच्यासोबत आले तर…; शिंदे गटाची ऑफर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार आमच्या सोबत आले तर आम्हाला आनंदच होईल असं मोठं विधान शिंदे गटाचे आमदार आणि मंत्री दीपक केसरकर यांनी केलं आहे. काही दिवसांपूर्वी एका कार्यक्रमात भाजप आमदार प्रवीण पोटे यांनी अजितदादांबद्दल बोलताना म्हंटल होत की, जर त्यांनी पहाटेच्या ऐवजी दुपारी शपथविधी केला असता तर आज अजित पवार राज्याचे मुख्यमंत्री झाले असते. त्याबाबत विचारलं असता केसरकर यांनी एकप्रकारे अजित पवारांना ऑफरच दिली.

प्रसारमाध्यमांशी बोलताना केसरकर म्हणाले, अजितदादा यांच्याबद्दल आमच्या सर्वाना आदर आहे. अजितदादा आमच्या सोबत आले तर आम्हाला आनंदच होईल. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये त्यांची होणारी घुसमट सर्वानी बघितली आहे. त्यामुळे त्यांच्यासारखा उमदा नेता सोबत आला तर कोणाला आवडणार नाही ? त्यामुळे पोटे यांनी तस विधान केलं असेल असं म्हणत केसरकर यांनी अजित पवारांना थेट ऑफरचं दिली आहे.

दरम्यान, विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी विधानसभा अध्यक्षांबाबत वापरलेल्या शब्दामुळे त्यांचे निलंबन करण्यात आलं. मात्र या कारवाईनंतरही अजित पवारांनी संयमी भूमिका घेतल्याने राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार नाराज असल्याची चर्चा सुरु होती. याबाबत खुद्द अजित पवारांनाच विचारलं असता ते थेट पत्रकारांवरच संतापले. हे तुम्हाला हे कोणी सांगितलं? पवार साहेबानी फोन करून सांगितलं आहे का? असा उलट सवाल अजित पवारांनी केला. विरोधी पक्षनेता म्हणून माझं काम कस असाव हे मला कळत, मी काय दुधखुळा नाही असं म्हणत त्यांनी पत्रकारांनाच खडेबोल सुनावले होते.