हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर आज सोन्या-चांदीच्या किंमतींमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. शनिवारी दिल्ली सराफ बाजारामध्ये 10 ग्रॅम सोन्याच्या किंमतीत 277 रुपयांची वाढ झाली आहे. सोन्याप्रमाणेच चांदीच्या किंमतीही वाढल्या आहेत. 1 किलो चांदीच्या किंमतीत 483 रुपयांची वाढ झालीय आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील दुसरा अर्थसंकल्प सादर केला.
सोन्याचे नवीन दर – शनिवारी दिल्ली सराफ बाजारामध्ये सोन्याचा भाव 41,646 रुपयांवरून 41,923 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. दरम्यान, शुक्रवारी सोन्याच्या किंमतीत प्रति 10 ग्रॅम 131 रुपयांची घट झाली. गुरुवारी सोन्याच्या भावात 400 रुपयांची वाढ नोंदली गेली होती तर बुधवारी सोन्याच्या किंमती खाली आल्या होत्या. आठवड्याच्या शेवटी परदेशी बाजारपेठा बंद असतात.
चांदीचे नवीन दर – दिल्ली सराफ बाजारामध्ये चांदीचे दर 47,613 रुपयांवरून 48,096 रुपयांवर गेले.
ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.
हे पण वाचा-
अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर शेयर मार्केटचा मूड खराब; सेन्सेक्स 800 अंकांनी खाली आला