आधार कार्डमध्ये केलेले बदल जाणून घेणे आता झाले सोपे, ‘या’ पद्धतीचा वापर करून जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आता आपले आधार कार्ड अपडेट केल्याची हिस्ट्री जाणून घेणे सोपे झाले आहे. आधार कार्ड सर्व्हिस देणारी संस्था युनिक आयडेंटिफिकेशन अ‍ॅथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI) च्या वेबसाइटवर जाऊन आपण सर्व डेमोग्राफिक आणि बायोमेट्रिक अपडेट केल्याचा इतिहास जाणून घेऊ शकता. ट्विटरवर ट्वीट करून UIDAI ने आधार अपडेट करण्याचे आणि आधार कार्ड अपडेटची हिस्ट्री चेक करण्यासाठीच्या स्टेप्सची माहिती संगितलेली आहे. UIDAI ने एका ट्यूटोरियल व्हिडिओद्वारे सर्व माहिती दिलेली आहे.

 

गेल्या 6 महिन्यांची हिस्ट्री कशी चेक करायची
सर्वप्रथम आपल्याला UIDAI ची वेबसाइट https://uidai.gov.in/ वर जावे लागेल आणि त्यानंतर आपल्या आधार डिस्क्रिप्शन मध्ये आपण दिलेल्या अपडेटची हिस्ट्री चेक करण्यासाठी ‘आधार अपडेट हिस्ट्री’ या लिंकवर क्लिक करावे लागेल. यामध्ये डेमोग्राफिक नाव, पत्ता, लिंग, ईमेल आयडी, मोबाइल नंबर आणि बायोमेट्रिकचा समावेश असेल. यूजर्सना आपला आधार नंबर किंवा व्हर्च्युअल आयडी तसेच सिक्योरिटी कॅप्चा भरावा लागेल. यानंतर, आपल्याला सिक्योरिटी कॅप्चा भरावा लागेल आणि एकदा तो भरल्यानंतर आपल्या रजिस्टर्ड मोबाइल नंबरवर वन टाइम पासवर्ड येईल. ओटीपी टाकल्यानंतर यूजर्सला त्याची आधार अपडेटची हिस्ट्री पाहता येईल.

जर आपण आपल्या आधार कार्ड मध्ये आपला पत्ता बदलला असेल किंवा आपले आधार कार्ड हे लहानपणी बनविले असेल आणि आपण मोठे झाल्यावर त्यातील फोटो बदलू इच्छित असाल तर आपण ऑनलाइन माध्यमातूनही ते सहजपणे ते बदलू आणि अपडेट करू शकता.

कोठे कमी येऊ शकते
गेल्या 2 किंवा 3 वर्षात नमूद केलेल्या डिटेल्स मधील बदलांविषयी लोकांना माहिती द्यावी लागेल अशा प्रकरणांमध्ये हे फीचर अतिशय प्रभावी आहे. विशेषत: जर पत्त्यात बदल केला असल्यास या फीचर च्या मदतीने आधार कार्ड धारक नोकरी, शाळा प्रवेश किंवा इतर गोष्टींसाठी त्यांचा अपडेट हिस्ट्रीचा वापर करू शकतात. Aadhaar Update History डाउनलोडही केले जाऊ शकते.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

You might also like
x Close

Like Us On Facebook

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com