‘शॉर्ट टर्म’ FD बद्दल तुम्हाला माहित आहे का? कालावधी फक्त ६ महिने

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । बचतीच्या दृष्टीने बँकेत फिक्सड डिपॉझिट (Fixed Deposit) हा लॉन्ग टर्म इन्व्हेस्टमेंटचा पर्याय म्हणून पाहिलं जात. मात्र आता देशात काही निवडक बँकांनी कमी काळाकरता म्हणजे शॉर्ट टर्म करता FDमध्ये गुंतवणूक करू शकतो. ज्याचा सर्वाधिक काळ हा सहा महिन्यांचा आहे. या काळात जमलेल्या राशीवर व्याज देखील चांगल्या स्वरूपात मिळत आहे.

या बँकेत आहे शॉर्ट टर्म FD ची सुविधा
सध्या SBI, PNB, HDFC आणि ICICI बँकेमध्ये ही सुविधा उपलब्ध आहे. देशात सरकारी किंवा खासगी बँका ग्राहकांना फिक्सड डिपॉझिटचा पर्याय उपलब्ध करन देतात. या बँकांच्या नियम आणि व्याज दर खालीलप्रमाणे:

SBI
सरकारी बँक असलेल्या SBI मध्ये ग्राहकांना २ करोडून कमी रक्कमेची एफडी ही ६ महिन्यापेक्षा कमी काळाकरता ४.४० टक्के व्याज दिलं जाणार आहे. ज्येष्ठ नागरिकांना यामध्ये ४.९० टक्के व्याज मिळणार आहे. जर एखादा ग्राहक २ करोडहून अधिक रक्कमेची एफडी करत असेल तर त्याला २.९०टक्के व्याज मिळणार आहे.

HDFC
एचडीएफसी बँकेत २ करोडहून कमी रक्कमेवर सहा महिन्याच्या एफडीवर ४.१० टक्के व्याज मिळणार आहे. ज्येष्ठ नागरिकांना ४.६० टक्के व्याज मिळेल. २ ते ५ करोडच्या एफडीवर ३.५० टक्के व्याज मिळणार आहे. ज्येष्ठ नागरिकांना या रक्कमेवर ४ टक्के व्याज मिळेल.

PNB
पंजाब नॅशनल बँकेत ६ महिन्याच्या कालावधीकरता २ करोडहून कमी रक्कमेवर ४.५० टक्के व्याज मिळेल. तर ज्येष्ठ नागरिकांना ५.२५ टक्के व्याज मिळणार आहे. २ ते १० करोड रुपयांच्या एफडीवर ३.२५ टक्के व्याज मिळेल.

ICICI
ICICI ब्खेत प्रीमॅच्युअर विदड्रॉयल फॅसिलीटी असलेल्या स्कीममध्ये २ करोड रुपयांपेक्षा कमी असलेल्या काळात ६ महिन्याकरता ४.२५ टक्के व्याज मिळणार आहे. ज्येष्ठ नागरिकांना ४.७५ टक्के व्याज मिळणार आहे. ५ करोड रुपयांपेक्षा कमी रुपयांना एफडी दर ३.५० टक्के व्याज मिळेल.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

Leave a Comment