नवी दिल्ली । मिथुन चक्रवर्तीच्या डान्सला आवाज (संगीत) देणारे बप्पी लाहिरी यांचे नाव समोर येताच एक रोमँटिक गायक म्हणून त्यांचे पहिले चित्र आपल्या मनात येते. वयाच्या 69 व्या वर्षी बप्पी दा यांनी बुधवारी सकाळी अखेरचा श्वास घेतला आणि जगाचा निरोप घेतला.
सोन्याचे दागिने घालण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या बप्पी दा यांनी किती संपत्ती मागे ठेवली याचा विचार आमच्याप्रमाणेच तुम्हीही केला असेल. त्याबरोबरच त्यांच्याकडे किती सोने आहे हे जाणून घेण्याची सर्वांनाच उत्सुकता असेल. प्रत्येकाला बप्पी दाच्या सोशल स्टेटसबद्दल माहिती असेलच, मात्र आज आम्ही तुम्हांला त्यांच्या फायनान्शिअल स्टेटसची माहिती देत आहोत.
3.5 कोटींचे घर आणि 55 लाखांची कार
बप्पी दा यांचे मुंबईत एक आलिशान घर आहे, जे त्यांनी 2001 मध्ये खरेदी केले होते. या घराची बाजारातील किंमत सध्या सुमारे साडेतीन कोटी रुपये आहे. याशिवाय त्यांना लगझरी गाड्यांचीही आवड होती. त्यांच्याकडे जगातील सर्वोत्तम 5 कार होत्या. BMW आणि Audi व्यतिरिक्त यामध्ये टेस्लाची 55 लाख रुपयांची कार देखील सामील आहे.
सोने घालणे लकी असल्याचे मानायचे
बप्पी दा यांना आपण नेहमीच 7-8 सोन्याच्या चैनी घातलेल्या पाहिले आहे. त्यांचे सोन्यावरील प्रेम सर्वश्रुत आहे. सोनं घालणे आपल्यासाठी लकी असल्याचे बप्पी दा यांनी अनेकदा सांगितले होते. त्यांच्याकडे वैयक्तिकरित्या अनेक सोन्याचे दागिने आहेत. 2014 च्या निवडणुकीदरम्यान झालेल्या खुलाशानुसार, बप्पी दा यांच्याकडे 750 ग्रॅम सोन्याचे दागिने होते. मात्र, आतापर्यंत त्यात आणखी वाढ झाली असण्याची दाट शक्यता आहे.
22 कोटींची एकूण मालमत्ता
बप्पी दा यांच्या संपत्तीवर नजर ठेवणाऱ्या वेबसाइट caknowledge नुसार, बप्पी लाहिरी यांच्याकडे डिसेंबरपर्यंत 3 मिलियन डॉलर म्हणजेच सुमारे 22 कोटी रुपयांची संपत्ती होती. एका चित्रपटातील गाण्यासाठी ते 8-10 लाख रुपये घेत असत. एखाद्या कॉन्सर्टमध्ये एक तासाचा कार्यक्रम करण्यासाठी बप्पी दा 20 ते 25 लाख रुपये घेत असत. त्यांचे मासिक उत्पन्न 20 लाख आणि वार्षिक उत्पन्न सुमारे 2.2 कोटी होते तर 11.3 कोटींची वैयक्तिक गुंतवणूक झाली आहे.