पंतप्रधान मोदींची प्रतिमा मलीन करण्याचा हेतू असणाऱ्या टूलकिट प्रकरणी भाजपच्या माजी मुख्यमंत्र्यांविरोधात FIR दाखल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रतिमा मलीन करण्याचा उद्देश असणाऱ्या टूलकिट प्रकरणी भाजपचे माजी मुख्यमंत्री यांच्याविरोधात एफआरआय दाखल करण्यात आली आहे. भाजपाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष रमण सिंह आणि भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. या दोघांनाही पुढील तपासासाठी समन्स बजावण्यात आले आहे अशी माहिती रायपूर सिव्हिल लाइन्सचे पोलिस एसएचओ आरके मिश्रा यांनी दिली आहे. आज आम्ही संबित पात्राला येथे वैयक्तिकरित्या किंवा व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे उपस्थित राहण्यास सांगितले आहे. छत्तीसगड प्रदेश कॉंग्रेस एनएसयूआय अध्यक्ष यांनी त्यांच्याविरोधात एफआरआय दाखल केली आहे असे एसएचओ आरके मिश्रा यांनी सांगितले आहे.

नेमकं काय आहे प्रकरण –

काही दिवसांपूर्वी काँग्रेसच्या नावाने एक टूलकिट सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. कोरोनाच्या नवीन स्ट्रेनला इंडियन स्ट्रेन किंवा मोदी स्ट्रेन म्हणावे अशासूचना कार्यकर्त्यांना देण्यात आल्याचं या टूलकिटवरून दिसत होत. मात्र हे टूलकिट बनावट असून याचा काँग्रेस पक्षाशी काहीही संबंध नाही असे राहुल गांधी, प्रियांका गांधी यांनी स्पष्ट केले होते. यानंतर सदर टूलकिट सोशल मीडियावर शेअर करणाऱ्याविरोधात तक्रारी दाखल करण्यात आल्या होत्या.

दरम्यान, भाजप प्रवक्ते संबित पात्र यांच्या विरोधात छत्तीसगढचे एनएसयूआय चे अध्यक्ष यांनी पोलिसांत तक्रार दिली होती. पोलिसांनी आता कारवाईला सुरवात केली असून संदीप पत्रासह छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री रमणसिंह यांच्याविरोधात एफआरआय दाखल करण्यात आली आहे.