Diwali 2023 : फटाक्यांच्या आतिषबाजीमुळे राज्यातील विविध भागात आगीच्या दुर्घटना

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| रविवारी राज्यात लक्ष्मीपूजनामुळे फटाक्यांची आतिषबाजी दिसून आली. परंतु अशा उत्साहाच्या वातावरणातच राज्यातील विविध भागात आगीच्या दुर्घटना घडल्या. ज्यामुळे अग्निशमन दलांच्या जवानांची धावपळ ही आग विझवण्यासाठी धावपळ दिसून आली. लक्ष्मीपूजनामुळे आणि दिवाळी असल्यामुळे रविवारी रात्रीच्या वेळी मोठया उत्साहात फटाके वाजवण्यात आले. परंतु या फटाक्यांमुळेच बऱ्याच ठिकाणी आग लागल्याच्या घटना घडल्या. या आगीत मोठया प्रमाणात नुकसान झाल्याचे सांगितले जात आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, दिवाळीत वाजवण्यात आलेल्या फटाक्यांमुळे राज्यातील पालघर, अहमदनगर, बुलढाणा, सोलापूर, पुणे, छत्रपती संभाजीनगर येथील विविध भागांत आग लागली होती. एकट्या पुणे शहरातच तब्बल 16 ठिकाणी फटाक्यांमुळे आग लागली होती. ही आग विझवण्यासाठी अग्निशामक दलाचे जवान तातडीने घटनास्थळी दाखल झाले. यानंतर त्याने परिस्थिती नियंत्रणात घेत ही आग विझवली. परंतु या लागोपाठ घडलेल्या या घटनेमुळे अग्निशामक जवानांची धावपळ उडाली. मुख्य म्हणजे, या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी खाजगी मालमत्तेचे मोठे नुकसान झाले आहे.

कोणत्या भागात लागली आग?

रविवारी एकट्या पुणे शहरात 16 ठिकाणी आग लागली होती. पुण्यात रास्ता पेठ, कोथरूड, कोंढवा, नाना पेठ, घोरपडे पेठ, शुक्रवार पेठ, गुरुवार पेठ, हडपसर अशा विविध ठिकाणी फटाक्यांच्या आतिषबाजीमुळे ही आग लागली होती. अहमदनगरमध्ये गुलमोहर रोड परिसरात देखील रात्री आग लागली होती. ही आग अग्निशामक दलाने तातडीने विझवली. पालघरमध्ये सृष्टी परिसरातील स्टेशनरीच्या दुकानाला आग लागली होती. या आगीत दुकानातील संपूर्ण साहित्य जळून खाक झाले. नाशिकमध्ये, फत्तेबुरूज नाक्यावर असलेल्या नाकोडा फॅशन दुकानाला आग लागली होती. या आगीत दुकानातील सगळे कपडे जळून गेले. छत्रपती संभाजी नगरमध्ये देखील विविध ठिकाणी आग लागल्याची दुर्घटना घडली.