सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके
सातारा येथील शिरवळ-पंढरपूर फाट्यावर रात्री उशिरा रस्त्याच्या कडेला असणाऱ्या 7 टपऱ्यांना भीषण आग लागली. आग नियंत्रणात आणण्यासाठी स्थानिक नागरिकांणी प्रयत्न केला मात्र आगीत टपऱ्यांमधील सर्व साहित्य जळून खाक झाले. यावेळी पोलीस आणि अग्निशामक दलाच्या साह्याने आग नियंत्रणात आणण्यात यश आले.
याबाबत अधिक माहिती अशी की, शिरवळ-पंढरपूर मार्गावर फाट्याशेजारी छोट्या-मोठ्या व्यावसायिकांनी विविध साहित्य विक्रीच्या टपऱ्या उभारल्या आहेत. या ठिकाणी सोमवारी रात्रीच्या सुमारास टपऱ्यांना आग लागली.
शिरवळ-पंढरपूर फाट्यावर 7 टपऱ्यांना भीषण आग
आगीमध्ये सर्व साहित्य जळून खाक; व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान pic.twitter.com/2ZAmKWCa9s
— santosh gurav (@santosh29590931) March 28, 2023
या आगीमध्ये तोऱ्यात साहित्य जळून खाक झाले. या ठिकाणी व्यवसायिकांकडून फळे, चिकन असे साहित्याची विक्री केली जात होती. ते साहित्यही जळून खाक झाले. यामध्ये विक्रेत्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.