कराड शहरात दिवाळीत फटाके वाजविण्यास मनाई : मुख्याधिकारी रमाकांत डाके

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड | कराड शहरात नागरिक विविध कार्यक्रम, प्रसंग व सण साजरे करण्यासाठी फटाक्यांचा वापर करत आहेत. यामुळे प्राणी व वनस्पती यासांठी हानीकारक असल्याने नगरपरिषदेच्या वतीने माझी वसुंधरा अभियानाचा भाग म्हणून कराड शहरात फटाके उडविण्यास प्रतिबंध करण्यात आले, असून नागरिकांनी त्याची अंमलबजावणी करावी असे जाहीर आवाहन कराड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी रमाकांत डाके यांनी केले आहे.

नगरपरिषदेने केलेल्या जाहीर आवाहनामध्ये म्हटले आहे, की विशेष सभा ठराव क्रमांक 4/ 27 दि. 15-7-2021 ने माझी वसुंधरा अभियानांतर्गत कराड शहरातील तमाम नागरिकांना आवाहन कळविण्यात येत आहे की, नागरिक विविध प्रसंग/सण साजरे करण्यासाठी फटाके जाळतात. फटाक्यामध्ये कार्बन आणि सल्फर असतात जे विषारी वायूंची क्षेणी तयार करतात. हे वायू वनस्पती आणि प्राणी दोघांनाही हानिकारक आहे.

त्यामुळे माझी वसुंधरा अभियानाचा भाग म्हणून कराड शहरात फटाके उडविण्यास प्रतिबंध जाहीर करण्यात येत असून नागरिकांनी त्यांची अंमलबजावणी करावी,अशी विनंती मुख्याधिकारी रमाकांत डाके यांनी केली आहे.

Leave a Comment