पुणे । पुणे पोलीस आयुक्त कार्यालयापासून अगदी हाकेच्या अंतरावर, भरदिवसा एका वृद्ध व्यक्तीवर गोळीबार झाल्याची धक्कदायक घटना घडली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. वृद्ध व्यक्तीला जखमी अवस्थेत खासगी रुग्णालयात तातडीने भरती करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. राजेश कनाबर (वय६३) असे मृत वृद्ध व्यक्तीचे नाव होते.
मिळालेल्या माहितीनुसार, मृतक राजेश कनाबर यांचा बाणेर येथील जागेवरून एक वादा होता. त्यासाठी ते जिल्हाधिकारी कार्यालयात आले होते. सुनावणी झाल्यावर, पुणे पोलीस आयुक्त कार्यालयपासून काही अंतरावर असलेल्या एसबीआय बँकेच्या बाहेरील फुटपाथवरून ते जात होते. त्याचवेळी दुपारी ३ वाजेच्या सुमारास मागून पळत आलेल्या २ हल्लेखोरांनी काही समजण्याच्या आतमध्ये त्यांच्यावर गोळी झाडली. गोळी लागून कनाबर खाली कोसळल्यानंतर हल्लेखोर घटनास्थळावरून पसार झाले.
जखमी राजेश कनाबर यांना तातडीने रूग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्याना त्यांचा मृत्यू झाला. या परिसरातील सीसीटीव्हीच्या माध्यमातून हल्लेखोरांचा तपास सुरू असल्याचे बंडगार्डन पोलिसाकडून सांगण्यात आले आहे. पुणे शहरात मागील काही दिवसात खून आणि चोरीच्या घटनामध्ये वाढ झाल्याचे दिसत आहे. काही दिवसांपूर्वी युवासेनेच्या एका पदाधिकाऱ्यावर काही जणांनी सपासप वर करून त्याचा निर्घृण खून केला होता.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”