हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मनसेचे पुणे जिल्हाध्यक्ष समीर थिगळे (Samir Thigale) यांच्यावर गोळीबार करण्यात आला आहे. राजगुरुनगरच्या सातकरस्थळ येथील त्यांच्या राहत्या घरासमोर हा प्रकार घडला. या गोळीबारात सुदैवानी कोणतीही जीवितहानी झाली नाही . नशीब बलवत्तर म्हणून थिगळे या घटनेत थोडक्यात बचावले. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.
मी खेडचा भाई आहे. एकाला घालवलाय. तुलाही माज आलाय. संपवतोच तुला”, असं म्हणत पिस्तुल रोखुन एकाने पैशाची मागणी करत समीर थिगळे यांना धमकी दिली. त्यानंतर या गुंडांनी समीर थिगळे यांच्या छातीवर गोळी झाडली. पण सुदैवाने यावेळी बंदुकीतून गोळी सुटली नाही. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. त्यानंतर या गुंडांना हवेत गोळीबार करून थिगळे यांना धमकावले आणि घटनास्थळावरून पोबारा केला.
एकनाथ शिंदेंची गत "नारायण वाघ" सारखी; कोणी उडवली खिल्ली?
वाचा सविस्तर-👉🏽 https://t.co/mSdWUwhGjW#Hellomaharashtra @ShivSena @ShivsenaComms @andharesushama
— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) January 22, 2023
या प्रकरणी राजगुरुनगर पोलिसांनी आरोपी मिलिंद जगदाळे आणि मयुर जगदाळे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. दोन्ही आरोपी सध्या फरार असून राजगुरूनगर पोलीस या गुंडांचा शोध घेत आहेत. मात्र समीर थिगळे यांच्या कुटुंबीयांसमोरच गोळीबाराची घटना घडल्याने आसपासच्या परिसरात आणि कुटुंबात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे