परभणी प्रतिनिधी | गजानन घुंबरे
राज्यात कोरोनाव्हायरस संसर्ग ग्रीनझोन मध्ये असणाऱ्या परभणी जिल्ह्यामध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला आहे. त्यामुळे जिल्ह्यात लॉक डाउन मधून सवलत देण्याचा विचार चालू असतानाच रुग्ण आढळल्याने खळबळ उडाली आहे.
पुण्याहून आलेल्या एका २१ वर्षीय तरुणाला लक्षणे आढळल्याने त्याचे विलगीकरण करत ,स्वॅब ची तपासणी करण्यात आली होती.संबंधित युवकाला आता शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्याच्या संपर्कात आलेल्या लोकांची चौकशी आणि तपासणी सुरू करण्यात येणार आहे.
खोल समुद्रात लपले आहे कोरोनावरचे औषध? पहा काय म्हणतायत अभ्यासक#coronavirus #coronaupdatesindia #HelloMaharashtrahttps://t.co/AmNrAG3QGs
— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) April 15, 2020
दरम्यान लॉक डाउन पासून आतापर्यंत जिल्हा प्रशासनाच्या चांगल्या बंदोबस्तामुळे कोरोना संसर्गाचाचा एकही रुग्ण जिल्ह्यात आढळला नव्हता , त्यामुळे सामान्य जनतेसह प्रशासन निश्चिंत होते परंतु आता नागरिकांसह प्रशासनाला चांगले सतर्क व्हावे लागणार आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “HelloNews”
इतर महत्वाच्या बातम्या –
राज्यातील करोनाग्रस्तांचा आकडा ३ हजार पार..
सोन्याच्या किंमतीने मोडले सर्व रेकोर्ड, जाणुन घ्या आजचे भाव
SBI ने ४० करोड ग्राहकांना केले अलर्ट, ‘या’ फेक वेबसाईट पासून रहा सावधान
धक्कादायक! सोलापूरात कोरोनाचे १० नवे रुग्ण
खरंच..! कोरोना चीनच्या प्रयोगशाळेत तयार झाला होता?
ब्रेकिंग बातम्यांसाठी पहा – www.hellomaharashtra.in