अपूर्ण सुशांत.. तो गेला पण आठवणी ठेवून; जाणून घ्या सुशांतच्या अपुऱ्या स्वप्नांची विशलिस्ट

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। दिवंगत बॉलीवुड अभिनेता सुशांत सिंग राजपूत याच्या निधनानंतर आज एक वर्ष उलटून गेले मात्र सुशांत आठवणीत आजही जिवंत आहे. त्याच्या निधनाने केवळ बॉलिवूड इंडस्ट्री नव्हे तर संपूर्ण देशात शोककळा पसरली होती. त्याच्या निधनानंतर राजकीय, सामाजिक, पोलिस खाते तसेच भारतातील प्रत्येक राज्यात याचे गंभीर पडसाद उमटताना दिसले. १४ जून २०२० हा दिवस सुशांतच्या चाहत्यांसाठी काळा दिवस ठरला. सुशांतच्या आत्महत्येने सर्वांनाच हादरा बसला होता. मात्र स्वतःहून स्वतःचे जीवन संपवणाऱ्या सुशांतवर हि वेळ का आली? कोणी आणली? हे आजही रहस्य आहे.

https://www.instagram.com/p/BvyOX5Lllnw/?utm_source=ig_web_copy_link

आपल्या प्रियजनांना कायमचे सोडून जाताना त्याच्या मनाला काय वेदना झाल्या असतील याची कल्पनाच असह्य आणि हतबल करणारी आहे. कदाचित योग्य वेळी त्याला योग्य साथ मिळाली असती तर आज त्याच्या निधनानंतर लोक त्याला नशेडी, चरसी आणि पळकुटा म्हणाली नसती. खरतर एखाद्याच्या आत्महत्येमागे संकुचित आणि चौकटीत जगणारा विकृत समाजच कारणीभूत आहे. कारण हा समाज अनोख्या व्यक्तिमत्वाशी पटवून घेण्याचे समर्थ ठेवत नाही. असो.. या दरम्यान अनेकांचे म्हणणे असेही होते कि हि आत्महत्या नसून हत्या आहे.. त्यामुळे सुशांत सिंग राजपूतचे निधन एक मोडे हत्याकांड सिद्ध होऊन आजही ह्याची केस सुरु आहे. सुशांतच्या मृत्यूचे कारण काहीही असले तरी सत्य हेच आहे कि, वयाच्या अवघ्या ३४ व्या वर्षी तो आपल्या चाहत्यांपासून दुरावला.

https://www.instagram.com/p/BwJLmVMlkIw/?utm_source=ig_web_copy_link

सुशांत एक उत्तम अभिनेता होता. त्याचसोबत तो अत्यंत जिज्ञासू विद्यार्थी देखील होता कारण तो अभ्यासात नेहमीच अव्वल असायचा. सुशांतने ‘पीके’, ‘छिछोरे’, ‘एम एस धोनी’ अश्या अव्वल चित्रपटांमधून उत्तम दर्जाच्या भूमिकांमधून प्रेक्षकांची मने जिंकली. इतकेच नव्हे तर त्याने स्वबळावर अभिनय क्षेञात स्वतःचे नाव कमावले आणि याचमुळे सुशांत आजही आठवणीतला तारा होऊन चमकतोय. दरम्यान सुशांतने त्याच्या एका डायरीमध्ये त्याच्या स्वप्नांनी विशलिस्ट अर्थात बकेट लिस्ट बनवून ठेवली होती. यात त्याने तब्बल ५० टास्क लिहून ठेवले होते. पण त्याच्या अचानक जाण्याने ही विशलिस्ट आणि स्वप्न सारं काही अधुरेच राहिले.

जाणून घ्या सुशांतच्या अपुऱ्या स्वप्नांची विशलिस्ट :-

१) विमान उडवण्यास शिकणे
२) आयरनमैन ट्रायथलॉनसाठी ट्रेन शिकणे
३) डाव्या हाताने क्रीकेट खेळणे
४) मोर्स कोड शिकने
५) लहान मुलांना खेडापाड्यात जाऊन शिकवणे
६) एखाद्या चॅम्पियन व्यक्तीसोबत टेनिसची स्पर्धा करणे
७) फोर क्लॅप पुशअप्स करणे.
८) एका आठवड्या करिता चंद्र, मंगल, बृहस्पति आणि शनि यांचे चार्ट प्रक्षेपवक्र करणे
९) ब्लु-होलमध्ये जाणे
१०) डबल-स्लिट एक्सपेरिमेंट करणे
११) किमान १००० झाडे लावणे
१२) कॉलेजमधील डीसीई हॉस्टेलमध्ये संध्याकाळचा वेळ घालवणे
१३) इस्रो / नासा येथे कार्यशाळांसाठी मुलांना शंभर अंकाचे चिन्ह पाठवणे
१४) कैलास पर्वतावर ध्यान करणे
१५) एका विजेत्यासोबत पोकर खेळणे
१६) एक पुस्तक लिहणे
१७) सर्नवर जाणे
१८) औरोरा बोरेलिस पेंट करणे
१९) नासाच्या कार्यशाळेत भाग घेणे
२०) ६ महिन्यांत ६ पॅक अ‍ॅब
२१) सिनोट्समध्ये पोहणे
२२) सूर्य, चंद्र आणि तारे जवळून पाहणे
२३) जंगलात एक आठवडा राहणे
२४) वैदिक ज्योतिष समजणे
२५) डिस्नीलँडला जाणे
२६) एल आय जीओला जाऊन, इमारतींवरुन सूर्यास्त पहाणे
२७) किमान १० नृत्य प्रकार जाणून घेणे
२८) शिक्षणासाठी मोफत पुस्तकांचे वाटप करणे
२९) एक शक्तिशाली दुर्बिणीने एंड्रोमेडा एक्सप्लोर करणे
३०) कमळ स्थितीत क्रिया योग पुरुष शिकणे
३१) अंटार्क्टिकाला भेट
३२) महिलांना स्व-संरक्षणाचे धडे देणे
३३) सर्व वयोगटातील महिलांना मोफत मार्शल आर्टचे प्रशिक्षण देणे
३४) शेती करणे शिकले पाहिजे
३५) मुलांना नृत्य शिकवणे
३६) पूर्ण रसायनीक – भौतिकशास्त्र पुस्तक पूर्ण करणे
३७) संपुर्ण पॉलिनेशियन खगोलशास्त्र शिकणे
३८) सक्रिय ज्वालामुखी पाहणे
३९) चॅम्पियनसोबत बुद्धीबळ खेळणे
४०) एका लॅम्बोर्गिनीचा मालक बना
४१) व्हिएना मधील सेंट स्टीफन कॅथेड्रल भेट देणे
४२) भारतीय संरक्षण दलासाठी विद्यार्थ्यांना तयार करण्यास मदत
४३) स्वामी विवेकानंदांवर माहितीपट बनवणे
४४) समुद्र सर्फींग करणे
४५) कृत्रिम बुद्धिमत्ता शिकून घेणे
४६) घातांक तंत्रज्ञानामध्ये काम करणे
४७) लहांन मुलांना अंतराळात जाण्यास मदत करणे
४८) अंध मुलांसोबत अख्खा एक दिवस वेळ घालवणे
४९) अंध व्यक्तींना कोडिंग शिकवणे
५०) माझ्या आवडत्या गिटारची ५० गाणी शिकणे

Leave a Comment