हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पेट्रोल आणि डिझेलच्या (First Ethanol Car Launched) वाढत्या किमतीमुळे सर्वसामान्य हैराण झाले आहेत. यावर उपाय म्हणून केंद्र सरकार इथेनॉलकडे पर्याय म्हणून पाहत आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी आज Toyota Corolla Altis Hybrid ही इथेनॉलवर चालणारी पहिली कार भारतात लॉन्च केली आहे. या वेळी केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव हे सुद्धा या लोकार्पण कार्यक्रमाला उपस्थित होते.
इथेनॉलवर चालणाऱ्या गाड्या किफायतशीर (First Ethanol Car Launched) आणि परवडणाऱ्या तर असतीलच परंतु यामुळे वायू प्रदूषणाचे पर्यावरणावर होणारे दुष्परिणामही टळतील. उसापासून इथेनॉल तयार होते. ऊस उत्पादनात भारताचा जगात पहिला क्रमांक लागतो. देशात उसाचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन होत असल्याने इथेनॉलचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर होऊ शकते. यामुळेच केंद्र सरकार इथेनॉलवर भर देत आहे. इथेनॉलवर चालणारी वाहने मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर आल्याने इथेनॉलची मागणी वाढेल आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे उत्पन्नही वाढू शकेल.
Launching Toyota’s first of its kind pilot project on Flexi-Fuel Strong Hybrid Electric Vehicles (FFV-SHEV) in India https://t.co/kFVuSLy0QE
— Nitin Gadkari (@nitin_gadkari) October 11, 2022
भारत हा जगातील तिसरा सर्वात मोठा तेल आयात करणारा देश आहे. आपली 85 टक्के मागणी पूर्ण करण्यासाठी आपण परदेशातून तेल आयात करण्यावर अवलंबून आहोत. इथेनॉलचा वापर वाढल्याने पर्यावरणावर तसेच देशातील शेतकऱ्यांच्या जीवनावर चांगले परिणाम दिसून येतील. इथेनॉल खरेदी वाढल्याने देशातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.
फ्लेक्स-इंधन वाहने म्हणजे काय ? (First Ethanol Car Launched)
फ्लेक्स इंधन वाहने ही दुचाकी किंवा चारचाकी वाहने असतात ज्यात एकच इंजिन असते. हे पेट्रोल किंवा इथेनॉल किंवा दोन्हीच्या (First Ethanol Car Launched) मिश्रणावर चालवता येते. इथेनॉल हा पेट्रोलला चांगला पर्याय ठरू शकतो. त्याचबरोबर पेट्रोलमध्ये इथेनॉल मिसळल्याने इंधनाचे दरही कमी होतात आणि प्रदूषणही कमी होते.
Toyota Corolla Altis Hybrid मध्ये 1.8-लिटर इथेनॉल रेडी पेट्रोल-हायब्रिड इंजिन आहे. हे इंजिन 101bhp पॉवर आणि 142.2Nm चा पीक टॉर्क जनरेट करते. यासह, कंपनीची स्वयं-चार्जिंग मजबूत हायब्रिड प्रणाली मिळते. गाडीचे इंजिन मैग्नेटिकसिंक्रोनस इलेक्ट्रिक मोटर आणि 1.3kWh बॅटरीशी जोडलेले आहे. त्याची इलेक्ट्रिक मोटर 72bhp पॉवर आणि 162.8Nm टॉर्क जनरेट करू शकते. सध्या भारतात या गाडीची किंमत जाहीर केलेली नाही. मात्र लवकरच याची किंमत जाहीर होऊ शकते.