पहिलं स्वदेशी मंकीपॉक्स टेस्ट किट लाँच; आता निदान होणार लवकर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । कोरोना नंतर मंकीपॉक्स आजाराने सगळीकडे थैमान घातले आहे. याच पार्श्वभूमीवर मंकीपॉक्स विषाणूची ओळख पटण्यासाठी पहिले स्वदेशी मंकीपॉक्स टेस्ट किट देशात लॉन्च करण्यात आले आहे. केंद्र सरकारचे प्रमुख वैज्ञानिक सल्लागार अजय कुमार सूद यांच्या हस्ते या किटचे अनावरण करण्यात आले. वैज्ञानिक सचिव अरविंद मित्रा, आयसीएमआरचे माजी महासंचालक बलराम भार्गव, जैवतंत्रज्ञान विभागातील सल्लागार अलका शर्मा आणि इतर लोक या लॉन्चिंग सोहळ्याला उपस्थित होते.

हे आरटीपीसीआर किट अतिशय संवेदनशील असून हाताळायला फार सोपं आहे. या किटची अचूकता चांगली असून लोकांना हे सोयीस्कर ठरू शकते. ट्रान्स एशियाचे संस्थापक अध्यक्ष सुरेश वझिरानी म्हणाले की, या किटच्या मदतीने संसर्ग लवकर ओळखला जाऊ शकतो. सध्या भारतात मंकीपॉक्सची १० रुग्ण आढळले आहेत.

दरम्यान, WHO ने जगभरात मंकीपॉक्सच्या प्रकरणांमध्ये वाढ झाल्याचा इशारा दिला आहे. जागतिक आरोग्य संस्थेच्या म्हणण्यानुसार, गेल्या आठवड्यात मंकीपॉक्सच्या प्रकरणांमध्ये 20 टक्क्यांनी वाढ झाली आहे, 92 देशांमधून 35,000 हून अधिक लोकांना संसर्ग झाला आहे तर 12 जणांचा मृत्यू झाला आहे.