वॉशिंग्टन । अमेरिकेचा एक उच्च उद्योगपती आणि सिस्कोचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी एक लाख ऑक्सिजन युनिट्स भारतात पाठवण्याच्या उद्दिष्टासाठी 10 लाख अमेरिकन डॉलर्स देणगीची घोषणा केली आहे. जॉन चेंबर्स हे यूएस मधील भारत-केंद्रित व्यवसाय सल्लागार गट, यूएस इंडिया स्ट्रॅटेजिक अँड पार्टनरशिप फोरम (यूएसआयएसपीएफ) चे अध्यक्ष आहेत.
उद्योगपतींनी खाजगी कोविड -19 मदत कार्यक्रमात जाहीर केलेल्या मदतीत ही सर्वाधिक दानाची घोषणा मनाली जात आहे. चेंबर्सनी ट्विट केले की, “मी एक लाख ऑक्सिजन युनिट्स भारतात पाठवण्याच्या उद्दिष्टाला मी वैयक्तिकपणे दहा लाख अमेरिकी डॉलर देत आहे.” त्यांनी इतरांनाही देणगी देण्यास प्रोत्साहन दिले आहे. अमेरिकेतुन वैयक्तिक स्थरावर आलेली ही पहिलीच मदत आहे.
करोनाच्या ह्या युद्धात भारताला मदत करण्यासाठी हळू हळू बरेच देश पुढे येत आहेत. अमेरिका, फ्रान्स, रशिया, सौदी अरेबिया, चीन इ. देशांकडून मदतीची घोषणा झाली आहे. काही देशांच्या मदतीच्या खेपा भारतात पोहचल्या देखील आहेत. भारतात देखील वयक्तिक स्तरावर बरेच उद्योगपती, सेलेब्रिटी मदतीचा हात पुढे करत आहेत. करोना युद्धात लढण्यासाठी ठीक ठिकाणी कोविड फंड देखील उभा केला जात आहे.