सातारा | उदयनराजे एक व्यक्ती यांनी स्वतःला किंवा कोणत्याही माणसाने कोणी स्वतःला फार मोठे समजू नये. महत्वाचे विचार असतो. छ. शिवाजी महराजांनी त्याच्या काळात एक विचार दिला तो आजपर्यंत एवढी वर्षे लोटली तरी विचार जिवंत आहे. जिवंत राहते ते विचार, आदर्श आणि संस्था राहते. माणसं येतात- जातात, डायरेक्टर अनेकजण होते आज ते दुर्देवाने आपल्यात नाहीत, आज आम्ही आहोत, उद्या आम्हीही नसो परंतु संस्था चालली पाहिजे. त्यामुळे मी किंवा कोणी स्वतःला फार मोठे समजू नये अशी पहिली प्रतिक्रिया सातारा जिल्हा बँकेत बिनविरोध निवडून आल्यानंतर खा. छ. उदयनराजे भोसले यांनी माध्यमांना दिली.
छ. उदयनराजे भोसले म्हणाले, ज्या हेतूने संस्था स्थापन झालेली त्या हिशोबाने बॅंक चालली पाहिजे. मनधरणी करायची की नाही, यासाठी प्रत्येकजण उदयनराजेंची वाट बघत नाही. प्रत्येकजण सज्ञान आहे, कोण माझीच काय कुणाची वाट बघत नाही. मी विचार मांडत असतो त्यात माझा स्वार्थ काय ? मी सर्वसामान्य माणसाच्या हिताचा विचार मांडला. मात्र काही लोकांना वाटले तो बॅंकेचा विरोधात विचार मांडला.
जिल्हा बॅंका सुरूवातीला चांगलेल्या होत्या. परंतु एकादा किड लागली की ती लवकर पसरते. त्यामुळे अनेक बॅंका लिक्विडिशनमध्ये निघाल्या. माझी एकच इच्छा आहे, सातारा जिल्हा बॅंकेचे वैभव असेल राहिले पाहिजे. मी डायरेक्टर असो किंवा नसो. ईडी नोटीसीची विचारणा केली, सुरूवातीच्या काळात काही गैर घडले असेल तर चाैकशी लागेल. परंतु जे काही असेल ते थांबवले नाही तर इतर बॅंकेच्या प्रमाणे या बॅंकेची अवस्था झाली असती.मी बिनविरोध झालो म्हणून मी एकदा विषय सोडावा असे काही नाही, असाही इशारा छ. उदयनराजे भोसले यांनी दिला.