हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आरक्षणासंदर्भात मला प्रश्न विचारायचा असेल तर या संभाजीराजेंना मुख्यमंत्री करा आणि मग प्रश्न विचारा. असं जर झालं तर नक्कीच बहुजांनाच्या हिताचं काम केल्याशिवाय राहणार नाही असे विधान छत्रपती संभाजीराजे यांनी केल्यानंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या. दरम्यान, छत्रपतींच्या या वक्तव्याला संभाजी ब्रिगेडने प्रत्युत्तर दिलं आहे. तुम्ही भाजपमधून बाहेर पडा, आम्ही तुम्हाला मुख्यमंत्री करायला तयार आहोत अस संभाजी ब्रिगेडने म्हंटल आहे.
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन तुम्हाला मला जाब विचारायचा असेल तर आधी मला मुख्यंमंत्रीपदावर बसवा, असे वक्तव्य खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी केले होते. मला त्यांना सांगायचंय, की तुम्ही पहिल्यांदा भाजपमधून बाहेर पडा आणि संभाजी ब्रिगेडमध्ये प्रवेश करा, आम्ही तुम्हाला मुख्यमंत्री करायला तयार आहोत”, असं प्रत्युत्तर संभाजी ब्रिगेडचे प्रवक्ते शिवानंद भानुसे यांनी दिले.
दरम्यान, संभाजीराजे यांनी खरंतर मराठा आरक्षणावरुन त्यांच्याकडे बोट दाखवणाऱ्या कार्यकर्त्यांना उत्तर देताना मुख्यमंत्रिपदाबाबत भाष्य केलं आहे. मात्र त्यांच्या मनात खरंच मुख्यमंत्रिपदाच्या महत्त्वाकांक्षा आहेत का, अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.