सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके
गुरुवारी सायंकाळी सातारा जिल्ह्यातील वाढे फाटा येथे सातारा पोलिसांच्या बंदोबस्तात मुंबईहून आणलेल्या ऑक्सिजनचा पहिला टँकर दाखल झाला. मात्र यावेळी सातारा आणि कोल्हापुर जिल्हाधिकाऱ्यांनी त्या टँकरवर हक्क सांगितला. त्यामुळे टॅंकर वाढे फाटा येथेच थांबविण्यात आला. आता प्रशासकीय मान्यता कोणला आहे, हे तपासल्यानंतर हा टॅंकर सातारा किंवा कोल्हापूरला मिळणार हे कळणार आहे.
सध्या देशासह राज्यात, जिल्ह्या- जिल्ह्यात ऑक्सिजनची गरज भागवण्यासाठी ऑक्सिजन एक्स्प्रेस धावत आहे. ऑक्सिजनच्या तातडीच्या वाहतुकीसाठी रेल्वेची मदत घेण्यात आली आहे. लिक्विड मेडिकल ऑक्सिजन आणि ऑक्सिजन सिलेंडरचे टँकर या रेल्वेत ठेवण्यात आलेले आहेत. सातारा जिल्ह्याच्या हद्दीत पहिला ऑक्सिजन टॅंकर आल्यानंतर त्यावरती हक्क कोणाचा हा प्रश्न निर्माण आता झाला आहे. यावेळी सातारा पोलिसांनी टॅंकर चालकांकडे कसून चाैकशी केली.
सातारा जिल्ह्यात काही ठिकाणी ऑक्सिजन पुरवठा कमी प्रमाणात आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी शेखरसिंह यांनी याबाबत उपाययोजना करण्याचे आज सकाळीच लोकांना सांगितले. त्यानंतर सातारा जिल्ह्यात आलेल्या टॅंकरने ऑक्सिजनचा प्रश्न काही प्रमाणात मिटण्यास मदत मिळेल असे वाटत होते. मात्र सातारा जिल्हाधिकारी यांच्यासोबत कोल्हापूरच्या जिल्ह्यांच्या जिल्हाधिकारी यांनी ऑक्सिजन टॅंकर हक्क सांगितल्याने, नक्की हा टॅंकर कोणाला मिळणार हे प्रशासकीय यंत्रणेच्या सूचनेनंतरच कळणार आहे.
सातारा जिल्ह्यासह राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा