Wednesday, February 1, 2023

1 लाख 10 हजार किमतीचा ऑक्सिजन टँकरच गायब, पोलीस ठाण्यात तक्रार दाखल

- Advertisement -

नवी दिल्ली वृत्तसंस्था: देशभर कोरोनाचा हाहाकार माजला आहे. अशातच कोरोना बाधित रुग्णांना लागणाऱ्या रेमडिसिवीर, ऑक्सिजन आणि लसीचा तुटवडा जाणवत आहे. काही ठिकाणी रेमडिसिवीरचा काळाबाजार तसेच लसी चोरीला गेल्याच्या घटना घडल्या आहेत. मात्र हरियाणामध्ये चक्क ऑक्सीजन टॅंकरच बेपत्ता झाला आहे. याबाबतची तक्रार पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

त्याचं झालं असं की, हरियाणा इथे पानिपत रिफायनरी हून सिरसाला इथे जात असलेला ऑक्सिजन द्रव्यांनी भरलेला टँकर बेपत्ता झाला. पानिपत ड्रग कंट्रोल ऑफिसर विजय राजे यांनी या प्रकरणी पानिपतच्या बोहली पोलीस ठाण्यात ऑक्सिजन टँकर चोरी झाल्याची तक्रार केली आहे. तर ट्रक पानिपत हुन सिरसाला रवाना करण्यात आला होता. दरम्यान हा टँकर इच्छित स्थळी पोहोचलाच नाही अशी माहिती स्टेशन हाऊस ऑफिसर मनजीत सिंग यांनी दिली.

- Advertisement -

1 लाख 10 हजार किमतीचा ऑक्सिजन टँकर गायब

पानिपतसह सिरसा चे पोलिसही टँकरचा शोध घेत आहेत. टँकरवर पंजाबचा नंबर असून चालतही बेपत्ता आहे. पानिपत रिफायनरी मध्ये एअर लिक्विड नोट्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनी ऑक्सिजन पुरवठा करते. या कंपनीतून बुधवारी रात्री एक ऑक्सिजन टँकर सिरसाला रवाना करण्यात आला होता. टँकरमध्ये आठ ऑक्सिजन आहे. याची किंमत जवळपास 1लाख 10 हजार इतकी आहे.

पानिपत हुन सिरसाला पोहोचण्यासाठी चार तास इतका कालावधी लागतो. मात्र या वेळेत सिरसा मध्ये टँकर न पोहोचल्याने पानिपत मध्ये कंपनीत संपर्क करण्यात आला. दरम्यान टँकर चालकाचा फोनही बंद येत आहे. टँकरचा शोध घेण्यासाठी पोलिस आता कसून तपास करत आहेत.