औरंगाबाद : घाटी रुग्णालयात आणखी पाच रुग्णांचा कोरोनाने बळी घेतला आहे. त्यात चार रुग्ण हे औरंगाबाद, तर एक रुग्ण जालना जिल्ह्यातील आहे. घाटी रुग्णालयात आणखी पाच रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचे घाटी प्रशासनाने जाहीर केले आहे.
त्यात हर्सूल, फुलेनगर येथील ३५ वर्षीय पुरुष, पुष्पानगरी येथील ८३ वर्षीय स्त्री, गोलेगाव सिल्लोड येथील ६५ वर्षीय स्त्री, वाळूज, औरंगाबाद येथील २१ वर्षीय पुरुष रुग्णाचा औरंगाबाद जिल्ह्यात मृत्यू झाला आहे. तर जालना भोकरदन ६५ वर्षीय स्त्री रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे घाटी रुग्णालयात आतापर्यंत ११२७ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
औरंगाबाद जिल्ह्यासह राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा