हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । IPL 2022 चा 15 वा सीझन आता शेवटच्या टप्प्यात आहे. यावेळी एकूण 10 संघानी सहभाग घेतला. यावर्षी रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आणि माजी चॅम्पियन असलेल्या राजस्थान रॉयल्स बरोबर नवे संघ असलेल्या गुजरात टायटन्स आणि लखनऊ सुपर जायंट्स संघानी आयपीएलच्या प्लेऑफमध्ये स्थान मिळवले. यानंतर राजस्थान आणि गुजरातने अंतिम फेरीत प्रवेश मिळवला. या हंगामात अनेक खेळाडूंनी बहारदार कामगिरीद्वारे आपापल्या संघासाठी फिनिशरची भूमिका बजावली. अशाच खेळाडूंबद्दल जाणून घेउयात…
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संघ अंतिम फेरीत पोहोचू शकला नसला तरीही यष्टिरक्षक फलंदाज दिनेश कार्तिकने आपल्या खेळाने चांगलाच प्रभाव पाडला. त्याला यावेळी ‘कमबॅक किंग’ असेही म्हटले जात आहे. चालू हंगामात त्याने 183.33 च्या स्ट्राइक रेटने एकूण 330 धावा केल्या. यावेळी खेळलेल्या एकूण 16 पैकी 10 डावात नाबाद राहिला. जेव्हा जेव्हा संघ अडचणीत सापडला तेव्हा तेव्हा कार्तिकने जोरदार योगदान दिले. IPL 2022
सध्याचा हंगाम मुंबई इंडियन्ससाठी भलेही निराशाजनक ठरला असेल मात्र टीम डेव्हिडने संघासाठी मोठे योगदान दिले. मुंबईने त्याला 8.25 कोटींमध्ये विकत घेतले. काही सामन्यांमध्ये त्याला बेंचवरही बसावे लागले. त्याने 21 चेंडूत 44, 18 चेंडूत 46 आणि 11 चेंडूत 34 धावांच्या धडाकेबाज खेळी करत मुंबईसाठी फिनिशरची भूमिका बजावली.
राशिद खान चांगली गोलंदाजी तर करतोच हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे. मात्र यावेळी त्याने जोरदार फलंदाजी करत काही सामन्यांमध्ये फिनिशरची भूमिका देखील बजावली. या हंगामात त्याला गुजरात टायटन्सने 15 कोटींमध्ये विकत घेतले. राशिद यावेळी संघाचा उपकर्णधारही आहे. तसेच त्याने 21 चेंडूत 40 धावा, 11 चेंडूत 31 धावा आणि 6 चेंडूत 19 धावा अशा तुफानी खेळी खेळल्या. यावेळी त्याचा स्ट्राइक रेट 206 पेक्षा जास्त होता. IPL 2022
राजस्थान रॉयल्सच्या शिमरॉन हेटमायरनेही या लिस्टमध्ये स्थान मिळवले आहे. राजस्थानने त्याला 8.5 कोटींमध्ये खरेदी केले. यावेळी त्याने बॅट बरोबरच बॉलनेही चांगलेच योगदान दिले. राजस्थानला फायनलपर्यंत पोहोचवण्यात त्याचा देखील मोलाचा वाटा आहे. त्याने आतापर्यंत 50.5 च्या सरासरीने आणि 157.81 च्या स्ट्राईक रेटने एकूण 303 धावा केल्या आहेत. IPL 2022
लियाम लिव्हिंगस्टोन या मोसमातील सर्वात मौल्यवान खेळाडूंपैकी एक होता. यावेळी त्याने पंजाब संघासाठी अनेकदा फिनिशरची भूमिका देखील बजावली. पंजाबने साखळी फेरीतील 14 पैकी एकूण 7 सामने जिंकले. मूळच्या इंग्लंडच्या असलेल्या लिव्हिंगस्टोनने या मोसमात एकूण 437 धावा केल्या. यावेळी त्याने 182 पेक्षा जास्त स्ट्राइक रेटने 4 अर्धशतकेही झळकावली. इतकेच नाही तर त्याने एकूण 34 षटकार देखील खेचले. त्याचवेळी त्याने 6 विकेटही घेतल्या. IPL 2022
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.iplt20.com/
हे पण वाचा :
IPL 2022 Final मध्ये पाऊस आला तर ‘हा’ संघ होणार होणार चॅम्पियन, जाणून घ्या काय आहे नवीन नियम
IPL 2022 : प्लेऑफमध्ये नेहमीच धोकादायक ठरतो आर अश्विन, आकडेवारी काय सांगते पहा
IPL 2022 : स्पॉट फिक्सिंगने पुन्हा एकदा डोकं वर काढलं, ऋषभ पंतचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल
IPL 2022: जोस बटलरने तोडला विराट कोहलीचा ‘तो’ रेकॉर्ड