व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

IPL 2022 : स्पॉट फिक्सिंगने पुन्हा एकदा डोकं वर काढलं, ऋषभ पंतचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – आयपीएल आणि वाद हे समीकरण आपल्याला काही नवीन नाही आहे. मैदानामध्ये कधी खेळाडूंमध्ये वाद होतात, तर कधी स्पर्धेवर फिक्सिंगचे आरोपी केले जातात. आयपीएल 2022 (IPL 2022) आता अखेरच्या टप्प्यात येऊन ठेपली असताना पुन्हा एकदा स्पॉट फिक्सिंगच्या आरोपांनी डोकं वर काढलं आहे. पाकिस्तानकडून मिळालेल्या 2019 च्या कथित स्पॉट फिक्सिंगच्या माहितीनुसार सीबीआयने सात संशयित सट्टेबाजांविरुद्ध एफआयआर दाखल केला. यानंतर लगेच आयपीएलचा 2019 मधील दिल्ली कॅपिटल्स आणि केकेआर यांच्यातील सामन्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

हा व्हिडिओ 2019च्या आयपीएलमधील दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार ऋषभ पंतचा आहे. आयपीएलचे माजी कमिशनर ललित मोदी यांनी 2019 साली हा व्हिडिओ शेअर केला होता. ऋषभ पंतला फोर कधी जाणार, हे आधीच माहिती होतं, असा दावा या व्हिडिओमध्ये करण्यात आला आहे. दिल्ली कॅपिटल्स आणि केकेआर यांच्यातल्या मॅचचा हा व्हिडिओ आहे.

काय आहे व्हिडिओमध्ये ?
केकेआरचा रॉबिन उथप्पा बॅटिंग करत असताना संदीप लामिछाने बॉलिंग करत होता, तेव्हा विकेट मागे उभा असलेला पंत हा तसाही फोर जाणार असल्याचं म्हणाला, असं ललित मोदींनी ट्विट केलेल्या व्हिडिओमध्ये दिसत आहे. त्यानंतर लामिछानेने बॉल टाकला आणि रॉबिन उथप्पाने त्यावर फोर मारला. यानंतर ‘ही काय मस्करी आहे, विश्वास बसत नाही. मोठ्या लेव्हलवर मॅच फिक्सिंग. आयपीएल (IPL 2022),  बीसीसीआय आणि आयसीसीला कधी कळेल? लाजिरवाणं, अधिकाऱ्यांना खरंच कशाची काळजी नाही,’ असं ट्वीट ललित मोदींनी त्यावेळी केले होते.

हे पण वाचा :

तुम्हाला नवाबभाई चालतात पण मुन्नाभाई चालत नाहीत…; राणेंचा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल

तुमचा नगरसेवक असलेल्या एखाद्या वॉर्डात फिरुन दाखवा; खासदार जलील यांचे फडणवीसांना आव्हान

केतकी चितळेचा अभिमान वाटतो ; सदाभाऊ खोत यांचे केतकीला समर्थन

वैफल्यग्रस्त विरोधी पक्ष नेत्यांना ब्रेक लागणे कठीण, अपघात अटळ आहे; फडणवीसांच्या सभेनंतर राऊतांचे ट्विट

उद्धवजी, तुमच्या सत्तेचा बाबरी ढाचा मी खाली पाडणार; देवेंद्र फडणवीसांचा करारा जवाब