Wednesday, October 5, 2022

Buy now

सांगलीत आयपीएल बेटिंगच्या पैशाच्या वादातून दोन गटात तुफान हाणामारी

सांगली : हॅलो महाराष्ट्र – सांगली जिल्ह्यातील मिरज शहरात सध्या अवैध धंद्यांचा सुळसुळाट सुरू आहे. त्यातच आता आयपीएल बेटिंगच्या (ipl betting) पैशाच्या वादातून दोन गटात तुफान राडा झाला आहे. यावेळी धारदार शस्त्रांनी घरावर हल्ला करत दगडफेक करण्यात आली आहे. यावेळी दोन्ही गट आमने-सामने आल्याने झालेल्या तुंबळ हाणामारीत (ipl betting)तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. विश्वास घोडके, लाईक इनामदार आणि जुबेर शरीकमसलात अशी या हाणामारीत जखमी झालेल्या व्यक्तींची नावे आहेत. याप्रकरणी 12 जणांच्या विरोधात मिरज शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी मिरज पोलीस अधिक तपास करीत आहेत.

बेटिंग पैशाच्या वादातून हाणामारी
मिरज शहरात आयपीएल बेटिंग (ipl betting) पैश्याच्या वादातून दोन गटात तुंबळ हाणामारी झाली आहे. या राड्या दरम्यान विश्वास धोंडीराम घोडके यांच्या घरावर तुफान दगडफेक करण्यात आली. तसेच घरावर दगड, विटा फेकून घरांच्या काचा फोडण्यात आल्या. याचबरोबर घराजवळ लावलेल्या एक बुलेटवर दगड घालून तिचे नुकसान करण्यात आले. यावेळी झालेल्या हाणामारीत विश्वास घोडके, लाईक इनामदार आणि जुबेर शरीकमसलात हे तिघेजण जखमी झाले आहेत.

या हाणामारीमुळे संपूर्ण परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या घटनेची माहिती मिळताच मिरज शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. दरम्यान या प्रकरणी घोडके आणि इनामदार या दोन्ही गटाकडून मिरज शहर पोलीस ठाण्यामध्ये परस्परविरोधी तक्रारी दाखल करण्यात आल्या. दोन्ही गटातील एकूण 12 जणांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी दोघा जणांना अटक करण्यात आली आहे.

हे पण वाचा :

दोन महिलांनी चोरल्या 90 हजारांच्या पैठण्या, चोरीची घटना CCTVमध्ये कैद

मृत पिल्लाला घेऊन हत्तीणीची फरफट, मन हेलावणारा व्हिडिओ आला समोर

कार चालकाच्या एका छोट्याशा चुकीमुळे महामार्गावर भीषण अपघात

नागपुरची कन्या संजना जोशी राष्ट्रकुल स्पर्धेत करणार भारताचे प्रतिनिधित्त्व, कोण आहे संजना जोशी ?

जिथे राष्ट्रवादी स्ट्राॅंग तिथे शिवसेनेवर अन्याय : खा. श्रीकांत शिंदे