नवी दिल्ली वृत्तसंस्था: नुकतेच पश्चिम बंगाल, आसाम, तमिळनाडू, केरळ आणि पद्दुचेरी या पाच राज्यांमध्ये नवे सरकार स्थापन होईल. यातील निवडणुकांच्या निकालाचा परिणाम देशाच्या इंधनाच्या दरावर झालेला दिसून येतो. तब्बल 66 दिवसानंतर पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ करण्यात आली आहे. मंगळवारी पेट्रोल 15 पैसे तर डिझेल 18 पैशांनी महाग झाले आहे.
मागील काही दिवसांचा विचार केला तर पेट्रोल आणि डिझेलच्या दरांत मध्ये 27 फेब्रुवारी पासून कोणतीही वाढ झाली नव्हती. मार्च महिन्यात उलट इंधनाच्या दरांमध्ये चार वेळा कपात झाली. मात्र आता आंतरराष्ट्रीय पातळीवर खनिज तेलाचे दर वाढल्याने भारतीय पेट्रोल कंपन्यांना इंधन दरवाढ करणे अपरिहार्य होतं मात्र पाच राज्यातील विधानसभा निवडणुका सुरू असल्याने केंद्र सरकार कोणताही धोका पत्करायला तयार नव्हतं त्यामुळे किमान मतदानाचा शेवटचा टप्पा संपेपर्यंत मोदी सरकार कडून पेट्रोल डिझेलचे दर कृत्रिमरीत्या कमी ठेवले जातील असा जाणकारांचा अंदाज होता.
आता निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर या पाचही राज्यांमध्ये नवे सरकार स्थापन होईल यापैकी आसाम, पुदुचेरी आणि तमिळनाडू राज्यात भाजपला अपेक्षित यश मिळालं. मात्र पश्चिम बंगाल आणि केरळ मध्ये भाजपवर हार पत्करण्याची वेळ आली आहे.
जाणून घ्या महाराष्ट्रातील इंधन दर
१)मुंबई -पेट्रोल -96.95, डिझेल 87.98
२)पुणे -पेट्रोल -96.60, डिझेल -86.30
३)नाशिक -पेट्रोल 97.36, डिझेल 87.04
४)औरंगाबाद – पेट्रोल -98.19, डिझेल 89.22
दररोज सकाळी दहा वाजता पेट्रोल आणि डिझेलचे सुधारित दर जाहीर केले जातात. सकाळी सहा वाजल्यापासून ते मध्यरात्रीपर्यंत संबंधित शहरात नमूद केलेल्या दराप्रमाणे पेट्रोल डिझेलची विक्री होत असते. पेट्रोल-डिझेलच्या मूळ किमतीमध्ये अबकारी कर, डीलर्स कमिशन आणि अन्य गोष्टींचा समावेश झाल्यानंतर ही किंमत जवळपास दुप्पट होते. पेट्रोल आणि डिझेलचे दर हे आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडींवर अवलंबून असतात.