खळबळजनक! पुण्यात २४ तासाच्या आत ५ जणांच्या गळफास घेऊन आत्महत्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । पुण्यातील सुखसागर भागातील एकाच कुटुंबातील चौघांनी आत्महत्या केल्याची घटनेला काही तास उलटत नाही तोच शहरातील धायरी भागातील एका मंडप व्यावसायिकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. मागील २४ तासांच्या आता शहरात आत्महत्येच्या पाच घटना घडल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. स्वप्निल उत्तम रायकर (वय 45 रा रायकर माळा, धायरी) असे आत्महत्या केलेल्या मृत व्यक्तीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत स्वप्निल रायकर यांचा मंडपचा व्यवसाय होता. स्वप्निल यांनी आज राहत्या घरी सकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास गळफास घेतला. त्यांच्या भावाच्या निदर्शनास हा प्रकार येताच तातडीन स्वप्निल यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. तणावातून आत्महत्या केल्याची माहिती समोर येत आहे. या घटनेचा तपास सिंहगड पोलीस करीत आहे.

दरम्यान, काल गुरूवारी रात्री पुण्यातील सुखसागर परिसरात राहणाऱ्या एकाच कुटुंबातील चौघा जणांनी गळफास लावून आत्महत्या केली आहे. गुरूवारी रात्री घडलेली ही घटना आहे. पती-पत्नी आणि दोन लहान मुलांचा यामध्ये समावेश असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. या धक्कादायक घटनेमुळे पुण्यात खळबळ उडाली आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”