पंढरपूरचा विठ्ठल रुक्मिणीचा गाभारा बनला काश्मिरी सफरचंदाचा बगीचा; 5 हजार सफरचंदाची सजावट

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आज राम नवमी निमित्त सर्वत्र उत्साहाचे वातावरण आहे. अगदी अयोध्यापासून ते पंढरपूर पर्यंत भाविकांकडून श्रीराम व सीतामाई तसेच विठू रुक्मिणीचे दर्शन घेत आहेत. आज रामनवमी निमित्त पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरातील गाभाऱ्याला आकर्षक अशा पद्धतीने सजावट करण्यात आली आहे. या सजावटीसाठी तब्बल 5 हजार काश्मिरी सफरचंदा वापर करण्यात आला असून त्याद्वारे बगीचा तयार करण्यात आला आहे. या सजावटीमुळे गाभारा व मंदिराचे रूप मनमोहक दिसत आहे.

आज संबंध देशभर रामनवमी उत्साहात साजरी केली जात आहे. या रामनवमी निमित्त पुणे येथील एका रामभक्ताने पंढरपूर येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या गाभाऱ्यात तब्बल पाच हजार काश्मिरी सफरचंदाची आकर्षक सजावट केली आहे. त्याच्या आकर्षक सजावटीमुळे विठूरायाची राउळी चक्क काश्मिरी सफरचंदाचा बगीचा बनली आहे.

पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात सण, उत्सव कालावधीत नेहमी आकर्षक पद्धतीने सजावट केली जाते. हि सजावट एक विशेष आकर्षणाचा भाग राहिली आहे. दरम्यान आज रामनवमी निमित्त पुणे येथील रामभक्त भरत रामचंद्र यादव यांनी सफरचंद व फुलांचा वापर करीत पंढरपूरच्या विठूरायाच्या मंदिरात आकर्षक अशी सजावट केली आहे.

सजावटीसाठी वापरल्या ‘या’ गोष्टी

पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरात सजावटीसाठी पाच हजार काश्मिरी सफरचंदनाचा वापर केला गेला आहे. यासाठी सफरचंदासह पांढरी आणि पिवळी शेवंती आणि दवणा याचा पायावर सजावटीसाठी करण्यात आलेला आहे.

Leave a Comment