शहरात पंधरा ठिकाणी कन्टेनमेंट झोन निश्चित

आज वसाहतींची नावे होणार जाहीर

 औरंगाबाद | शहरात कोरोना संसर्ग मोठ्या प्रमाणावर वाढत असल्याने कन्टेनमेंट झोन निश्चित करून त्या- त्या भागात प्रभावी उपायोजना राबवण्याचे शासनाचे आदेश आहेत. त्यानुसार औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशन कंपनीच्या टीमकडून कन्टेनमेंट झोन निश्चित करण्यात आले आहेत. या टीमने शहरातील पंधरा वसाहतीत कन्टेमनेंट झोन म्हणून निश्चित केल्या असून आज सायंकाळपर्यंत त्यांची नावे घोषित केली जाणार असल्याची माहिती सहायक प्रकल्प व्यवस्थापक स्नेहा नायर यांनी दिली.

जिल्ह्यात कोरोनाचा संसर्गाचा उद्रेक झाला आहे. मार्च महिन्यात तब्बल 32 हजार 313 कोरोना रूग्ण नव्याने आढळले आहे. विशेष म्हणजे, यात सर्वाधिक शहरातील बाधितांचा समावेश आहे. ग्रामीण भागाच्या तुलनेत शहरात अधिक दाट वसाहती, बाजारपेठांतील गर्दी,शहरात पंधरा कंन्टेनमेंट झोन निश्चित वाहनांची वर्दळ असून त्यातच नागरिकांकडून नियमांचे पालन केले जात नसल्याने कोरोनाचा संसर्ग अधिक गतीने पसरत आहे. मागील वीस दिवसांपासून शहरात नित्याने हजारपेक्षा अधिक रूग्ण आढळून येत असल्याने परिस्थिती चिंतानजक बनली आहे. त्यामुळे शासन निर्देशान्वये कोरोनाच्या नियंत्रणासाठी कन्टेनमेंट झोन निश्चित करून त्या भागातील अधिकाधिक नागरिकांच्या चाचण्या करण्यासह प्रभावी उपाययोजना राबवण्याचे नियोजन पालिकेने केले आहे. लसीकरणाची जम्बो मोहीम राबवली जाणार आहे.

या अनुषंगाने मागील पंधरा दिवसांपासून शहरातील कन्टेनमेंट झोन निश्चित करण्याचे काम एएससीडीसीएल कंपनीच्या टीमकडून सुरू आहे. स्मार्ट सिटीचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी पुष्कल शिवम, सहायक प्रकल्प व्यवस्थापक स्नेहा नायर यांच्या नेतृत्वात कन्टेनमेंट झोन निश्चित करण्यासाठी सर्वेक्षणाचे काम सुरू आहे. या टीमने सर्वेक्षण करून शहरातील प्रमुख पंधरा वसाहती कन्टेनमेंट झोन म्हणून निश्चित केल्या आहेत. मात्र सध्या यादी अंतिम करण्याचे काम सुरू आहे. या वसाहतींची नावे आज निश्चित करून जाहीर केली जातील, अशी माहिती स्नेहा नायर यांनी दिली.

तीन प्रकारांत कन्टेनमेंट झोनचे वर्गीकरण…

शासन निर्देशानुसार तीन प्रकारात कन्टेनमेंट झोनचे निश्चित केले जात आहेत. शहरातील पालिकेच्या 37 आरोग्य केंद्रांतर्गत कार्यरत असणार्‍या आशा वकर्सकडून टॅकिंग सिस्टीमद्वारे सर्वेक्षण करून तीन प्रकारांत कन्टेनमेंट झोन निश्चित केले आहेत. त्यानुसार मायक्रो कन्टेनमेंट एरियात 20 आणि त्याहून अधिक सक्रिय रूग्ण असलेल्या वसाहती, मध्यम कन्टेनमेंट एरियात 70 आणि त्यापेक्षा जास्त सक्रिय रूग्ण असलेल्या वसाहती, तर ज्या भागात मध्यम कन्टेनमेंट झोनअंतर्गत 1 हून अधिक कॉलनी आहेत आणि जवळच्या भागातील 100 पेक्षा जास्त सक्रीय रूग्ण आहेत त्यांना मेजर कंटेनमेंट झोन म्हणून घोषित केले जाणार आहे, असे माहिती अधिकार्‍यांनी दिली.

औरंगाबाद जिल्ह्यासह राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Grou

You might also like