हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Fixed Deposits : RBI कडून काही दिवसांपूर्वीच रेपो रेट आणि CRR (कॅश रिझर्व्ह रेशो) मध्ये वाढ करण्यात आली होती. यानंतर आता अनेक बँकांनी आपल्या FD वरील व्याजदर वाढवण्याची घोषणा केली आहे. अशातच आता खासगी क्षेत्रातील बँक असलेल्या फेडरल बँकेनेही आपल्या 2 कोटी रुपयांपर्यंतच्या FD वरील व्याजदरात वाढ केली आहे.
ही वाढ सर्व प्रकारच्या Fixed Deposits वर करण्यात आली आहे. तसेच 16 मे 2022 पासून हे नवीन दर लागू करण्यात आले आहेत. फेडरल बँकेने म्हटले आहे की, 7 दिवसांपासून ते 2,223 दिवसांपर्यंतच्या डिपॉझिट्सवरील व्याजदर 2.65 टक्के ते 5.75 टक्के असतील. तसेच ज्येष्ठ नागरिकांना अर्धा टक्का जास्त व्याज दिले जाईल.
फेडरल बँक आता 7 ते 29 दिवसांच्या डिपॉझिट्सवर 2.65 टक्के व्याज देणार आहे. यापूर्वी या डिपॉझिट्सवर 2.5 टक्के व्याज दिले जात होते. त्याचप्रमाणे 30 ते 45 दिवसांच्या Fixed Deposits वरील व्याजदरात 25 बेसिस पॉइंट्सने वाढ करण्यात आली आहे. तो 3 टक्क्यांवरून 3.25 टक्क्यांवर पोहोचला आहे. फेडरल बँक 46 दिवस ते 60 दिवसांच्या मुदतीच्या डिपॉझिट्सवर 3.65 टक्के तर 61 दिवस ते 90 दिवसांच्या डिपॉझिट्सवर 3.75 टक्के दराने व्याज देत आहे. यापूर्वी यावर 3.25 टक्के व्याजदर मिळत होता.
91 ते 119 दिवस आणि 120 ते 180 दिवसांच्या Fixed Deposits वर फेडरल बँक अनुक्रमे 4 टक्के आणि 4.25 टक्के व्याज देत आहे. यापूर्वी त्यावर 3.75 टक्के व्याजदर दिला जात होता. 181 दिवस ते 270 दिवस आणि 271 दिवस ते एक वर्षाच्या FD वर अनुक्रमे 4.5 टक्के आणि 4.75 टक्के व्याजदर असेल. यापूर्वी बँक या वर 4.4 टक्के व्याज देत होती. याबरोबरच गुंतवणूकदारांना 1 वर्ष ते 549 दिवसांच्या FD वर 5.4 टक्के तर 550 दिवसांच्या FD वर 5.50 टक्के व्याज दिले जाईल. 551 दिवसांपासून ते 2 वर्षांपर्यंतच्या FD वर 5.40 टक्के व्याजदर असेल. 2 वर्षे ते 3 वर्षे डिपॉझिट्सवरील व्याजदर 5.35 टक्के तर 3 वर्षे ते 5 वर्षे डिपॉझिट्सवरील व्याजदर 5.75 टक्के करण्याची घोषणा करण्यात आली आहे.
5 वर्षे ते 2,221 दिवसांपर्यंतच्या Fixed Deposits वरील व्याजदर आधी 5.6 टक्के होता. त्यात 15 बेसिस पॉइंट्सने वाढ होऊन तो 5.75 टक्के करण्यात आला आहे. 2,222 दिवसांत मॅच्युर होणाऱ्या डिपॉझिट्सवरील व्याजदर आधी 5.6 टक्के होता, जो 20 बेसिस पॉइंट्सनी वाढवून 5.75 % करण्यात आला आहे.
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.federalbank.co.in/deposit-rate
हे पण वाचा :
ICICI Bank कडून FD च्या व्याजदरात वाढ !!! नवीन दर पहा
Bank FD Rates : FD उघडाताय… जरा थांबा !!! कोण-कोणत्या बँका जास्त व्याज देत आहेत ते पहा
Bank FD : आता ‘या’ बँकांनी देखील आपल्या FD च्या व्याजदरात केली वाढ, नवीन दर तपासा
Yes Bank कडून ग्राहकांना धक्का, मुदतपूर्व FD काढण्याच्या दंडात केली वाढ
FD Rates : आता ‘ही’ सरकारी बँक FD वर जास्त व्याज देणार, नवीन दर तपासा