हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | Fixed Deposits : गेल्या काही महिन्यांपासून RBI कडून रेपो दरात सातत्याने वाढ केली जाते आहे. मात्र यामुळे बँकांकडून लोकांना कमाईची चांगली संधी देखील मिळाली आहे. तसेच या सुरक्षित मार्गाने पैसे कमवण्यासाठी मुदत ठेवीमध्ये गुंतवणूक करू शकता. देशातील जवळपास सर्वच सरकारी बँका यावेळी भरपूर FD वर चांगला रिटर्न देखील देत आहेत. ज्याचा आपल्याला फायदा घेता येऊ शकेल.
हे लक्षात घ्या कि, सार्वजनिक क्षेत्रातील इंडियन ओव्हरसीज बँक (IOB) आणि UCO बँकेने आपल्या ₹2 कोटींखालील Fixed Deposits वरील व्याजदरात वाढ केली आहे. बँकेच्या अधिकृत वेबसाइटनुसार, 10 जानेवारी 2023 पासून हे सुधारित दर लागू झाले आहेत.
इंडियन ओव्हरसीज बँकेच्या एफडीचे नवीन दर
इंडियन ओव्हरसीज बँकेकडून 444 दिवसांच्या स्पेशल Fixed Deposits वरील व्याजदरात 45 बेस पॉईंट्सपर्यंत वाढ केली आहे. मात्र उर्वरित कालावधीसाठी बँकेने व्याजदरात कोणताही बदल केलेला नाही. यानंतर आता बँक 444 दिवसांच्या कालावधीसाठी जास्तीत जास्त 7% व्याज दर देत आहे. तसेच दुसरीकडे, UCO बँकेने ₹ 2 कोटींपेक्षा कमी किंमतीच्या फिक्स्ड डिपॉझिट्सवरील व्याजदरातही वाढ केली आहे. बँकेच्या अधिकृत वेबसाइटनुसार, हे सुधारित दर 9 जानेवारी 2023 पासून लागू झाले आहेत.
युको बँकेच्या एफडीचे नवीन दर
युको बँकेने आपल्या 1 वर्ष ते 5 वर्षे आणि त्याहून जास्त कालावधीच्या व्याजदरात 50 बेस पॉईंट्सपर्यंत वाढ केली आहे. आता यानंतर आता बँक सात ते नऊ दिवसांच्या Fixed Deposits वर 2.90% तर 30 ते 45 दिवसांच्या फिक्स्ड डिपॉझिट्सवर 3.00% व्याज देत आहे. त्याचप्रमाणे बँकेकडून 46-120 दिवसांच्या फिक्स्ड डिपॉझिट्सवर 4% तर 121-150 दिवसांच्या फिक्स्ड डिपॉझिट्सवर 4.50% व्याजदर देत राहील.
बँक ऑफ इंडियाच्या एफडीचे नवीन दर
बँक ऑफ इंडियाने आपल्या 444 दिवसांच्या 2 कोटी रुपयांपेक्षा कमी किंमतीच्या स्पेशल फिक्स्ड डिपॉझिट्सवरील व्याजदरातही वाढ केली आहे. यानंतर आता बँकेकडून स्पेशल फिक्स्ड डिपॉझिट्सवर सर्वसामान्य नागरिकांना 7.05% तर ज्येष्ठ नागरिकांना 7.55% व्याज दर देत कर. त्याच प्रमाणे सर्वसामान्य नागरिकांसाठी, 7 दिवसांपासून ते 10 वर्षांपर्यंतच्या मुदतीच्या इतर फिक्स्ड डिपॉझिट्सवरील व्याजदर 3% ते 6.75% च्या श्रेणीत आहेत.
अधिक माहितीसाठी ‘या’ वेबसाईटला भेट द्या : https://www.iob.in/Domestic_Rates
हे पण वाचा :
Surya Nutan Solar Stove : महागड्या गॅसपासून मिळवा सुटका, घरी आणा सौरऊर्जेवर चालणारा ‘हा’ स्टोव्ह
Bank of Baroda च्या ग्राहकांना मोठा धक्का !!! आता कर्ज घेण्यासाठी मोजावे लागणार जास्त पैसे
FD Rates : ज्येष्ठ नागरिकांसाठी ‘ही’ बँक देतेय 8% व्याजदर
बँकेच्या खात्याशी संबंधित नियमांत बदल, RBI म्हंटले कि…
Doorstep Banking म्हणजे काय ??? त्याचा फायदा कोणाकोणाला मिळेल ते जाणून घ्या